Churchill Alemao यांची तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षात प्रवेश करण्याची तयारी
Churchill Alemao यांची तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षात प्रवेश करण्याची तयारी Dainik Gomantak

चर्चिल आलेमाव यांची तृणमूल प्रवेशासाठी बाणावलीत चाचपणी

बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) आणि त्यांची कन्या वालंका आलेमाव यांनीही तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षात प्रवेश करण्याची तयारी चालविली आहे.
Published on

मडगाव: गांधी घराण्यातील व्यक्तीच देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे, या चुकीच्या हट्टापायी काँग्रेस (Congress) पक्ष फुटला, अशी प्रतिक्रिया चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली. ते म्हणाले, गोव्यात (Goa) जर भाजपला (BJP) हरवायचे असेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी (NCP) एकत्र येण्याची गरज आहे. पण मागचे तीन महिने काँग्रेसने आम्हाला झुलवत ठेवले आहे. 29 नोव्हेंबरपर्यंत काँग्रेसने युतीबद्दल भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा मी माझा निर्णय घेण्यास मोकळा आहे, असे त्यांनी ठणकावले.

Churchill Alemao यांची तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षात प्रवेश करण्याची तयारी
चर्चिल आणि वालांका लवकरच तृणमूलवासी

बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव आणि त्यांची कन्या वालंका आलेमाव यांनीही तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची तयारी चालविली आहे. चर्चिल आलेमाव यांनी बाणावली मतदारसंघातील पंचसदस्य आणि कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी घेऊन आपला निर्णय त्यांना कळविला आहे. कार्यकर्त्यांनीही त्यांना हिरवा कंदील दाखविला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चर्चिल यांनी बाणावलीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे.

Churchill Alemao यांची तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षात प्रवेश करण्याची तयारी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षात युती होणारच; चर्चिल आलेमाव

व्हिटामीन ‘एम’च्या अभावामुळे पक्षांतर

चर्चिल यांना बाणावलीतून तर वालंका हिला नावेलीतून उमेदवारी हवी आहे. त्यांच्या या दोन्ही अटी पूर्ण झाल्या तरच त्यांना काँग्रेस - राष्ट्रवादी युतीत रस आहे. मात्र, काँग्रेस नावेलीची जागा सोडण्यास तयार नसल्याने त्यांंनी तृणमूलचा पर्याय खुला ठेवला आहे. यावेळी चर्चिल यांना निवडणुकीत निधी पुरविण्यासही राष्ट्रवादीने नकार दिल्याची माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com