दाबोळी: गोव्यात दिल्ली व पश्चिम बंगालचा मॉडल चालणार नसून येथे फक्त मनोहर पर्रीकर मॉडेल चालणार आहे. गोव्यात होत असलेला विकास म्हणजे पर्रीकर यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाचे फळ असून त्याचे राहिलेले कार्य मुख्यमंत्री (CM) डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) पुढे घेऊन जाणार आहे. यात सावंत यांना महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा गोवा भाजप मुख्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, गोव्यात दिल्ली व पश्चिम बंगालचा मॉडल अजिबात चालणार नसून येथे फक्त भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर मॉडेल चालणार आहे. कारण पर्रीकर यांचे नेतृत्व म्हणजे राज्याचा विकास कशा प्रकारे करावा. केंद्र सरकारच्या सहकार्याने गोव्यातील भाजप सरकारने उत्तर ते दक्षिण पर्यंत मजबूत विकासाचा पाया रचला आहे. गोव्यातील सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोवा आधुनिक पद्धतीचा नजरेस पडणार आहे. यामुळे भविष्यात गोव्यात इलेक्ट्रॉनिक औद्योगिक (Electronic Industrial) तयार होईल अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
संपूर्ण जगात भारत देशाने वेक्सिन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुशल नेतृत्व आरोग्य क्षेत्रात प्राप्त झाले. तर गोव्यातील सावंत सरकारने शंभर टक्के लसीकरण करून भारत देशात गोव्याचे नाव अग्रेसर आणले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री सावंत म्हणजे भाजपचे डबल इंजिन सारखे दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्य करीत असल्याची माहिती फडणविस यांनी दिली.
गोवा राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की गोव्या बरोबर संपूर्ण देशात काँग्रेस पक्ष संपल्यातच जमा झाला आहे. गोव्यातील जनता मोदी सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असून येणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप पूर्ण बहुमताने निवडून येणार असल्याची माहिती तानावडे यांनी दिली. नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी सांगितले की स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वामुळे आज मुरगावात भाजप नवी दिशा प्राप्त झालेली आहे. मुरगावच्या विकासात मनोहर पर्रीकर यांचा मोलाचे मोलाचा वाटा आहे.
पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सावंत गोवा विकासाच्या मार्गाने घेऊन जात आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या सहकार्याने गोव्यात भाजप येणारी विधानसभा मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याची माहिती शेवटी मंत्री नाईक यांनी दिली. कार्यक्रमात सर्वांचे स्वागत मुरगाव भाजप अध्यक्ष संजय सातार्डेकर तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद सातार्डेकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
मुरगांव भाजप परिवारातर्फे सडा येथील श्री इस्वटी ब्राह्मण लक्ष्मीनारायण सभागृहात आयोजित कार्यक्रमात वरील माहिती गोवा भाजप मुख्य प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे, मुरगावचे आमदार तथा नगरविकास मंत्री मिलिंद नाईक, मुरगाव भाजप अध्यक्ष संजय सातार्डेकर, मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, नगरसेवक विजय मयेकर, दयानंद नाईक, मंजुषा पिळणकर, मृणाली मांजरेकर, माजी उपनगराध्यक्ष शशिकांत परब, संदीप मालवणकर, माजी नगराध्यक्ष अर्चना कोचरेकर, माजी नगरसेवक मुरारी बांदेकर, मुरगाव युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद सातार्डेकर, विजय नागवेकर, जय प्रकाश पेडणेकर, शेखर मांजरेकर, महिला कार्याध्यक्ष छाया होन्नावरकर व इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.