Goa Assembly Election: साळगावात कोण जिंकणार जयेश की केदार?

राजकीय स्थित्यंतर: वेगळीच गोळाबेरीज शक्य
Congress and BJP
Congress and BJP Dainik Gomantak

म्हापसा: साळगाव विधानसभा मतदारसंघात अलीकडच्या काही दिवसांत झालेल्या राजकीय स्थित्यंतरांमुळे या ठिकाणी भाजपसमोर काँग्रेसचे (congress)आवहान तगडे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपमधील अंतर्गत धुसफूस याला कारणीभूत ठरेल, असे तेथील मतदारांच्या मनाचा कानोसा घेतला असता प्रकर्षाने जाणवले.

Congress and BJP
Goa Election 2022: मडगावात कोण जिंकणार बाबा की बाबू?

निवडणुकीपूर्वी सुमारे महिनाभराच्या कालखंडात घडलेल्या राजकीय उलथापालथींचा व नेत्यांच्या स्थानिक राजकीय नेत्यांच्या वैचारिक स्थित्यंतरांमुळे या निवडणुकीवेळी मतदानाबाबत वेगळीच गोळाबेरीज होईल, हे तर सर्वश्रूतच आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, भाजपमध्ये असलेले केदार नाईक व जिल्हा पंचायत सदस्य रूपेश नाईक यांना डावलून अंतिम क्षणी भाजपमध्ये (BJP) जयेश साळगावकर यांना आयात करून त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे चिडून केदार नाईक यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवली, तर रूपेश नाईक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

Congress and BJP
Goa Election 2022: कळंगुट, शिवोली मतदारसंघात 80 टक्क्यांहून अधिक मतदान

माजी मंत्री साळगावकर यांनी केलेल्या कामांची मतदार पोचपावती देतील,असा दावा काही भाजप समर्थकांनी केला. सध्या काँग्रेसला पोषक वातावरण असले तरी साळगावकर यांचा पराभव निश्चित आहे, असेही ठामपणे म्हणता येत नाही. विजयी होणाऱ्याचे तीनशे ते पाचशे एवढे कमी मताधिक्य असू शकते. मतदारसंघात पैशांचे वाटप मोठ्या प्रमाणात झाले असून, त्याचा प्रभाव किती होतो, यावरही सारे अवलंबून आहे.

जयेश साळगावकर आणि केदार नाईक यांना समसमान संधी असल्याचे मतदारसंघाचा कानोसा घेतला असता आढळून आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com