विश्‍वजीत राणे नव्या सरकारच्या नेतृत्वाचे दावेदार: सुदिन ढवळीकर

टपाल मतदान प्रक्रिया रद्द कर: सुदिन ढवळीकर
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विश्‍वजीत राणे (Vishwajit Rane) हे सध्या नव्या सरकारच्या नेतृत्वाचे दावेदार आहेत. राणे यांच्याशी आमची 2 ते 3 दिवसाआड भेट होत असते. मात्र, या भेटीचा कोणी राजकीय अर्थ काढू नये, असे सांगून सुदिन ढवळीकर(Sudin Dhavalikar) यांनी अप्रत्यक्षरित्या विश्‍वजीत राणे यांच्या मुख्यमंत्री पदाला समर्थन दिले आहे. (Goa Politics News)

Sudin Dhavalikar
'गोव्यात भाजपच्या मिशन कमिशनचा सरकारी तिजोरीला 4 कोटींचा फटका'

मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी मतदानानंतर पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, मगोच्या एका उमेदवाराशी संपर्क एका मंत्र्याने केला. मात्र विजयी होण्यापूर्वीच अशाप्रकारच्या संपर्काला काही अर्थ नाही, असे ते म्हणाले.

राज्यातील मतमोजणी होण्यापूर्वीच राष्ट्रीय पक्षांनी संभाव्य विजयी उमेदवारांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजपमधील (BJP) आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे अशावेळी सध्याच्या घडीला विश्‍वजीत राणे हेच नेतृत्वासाठी पात्र दावेदार आहेत असे मत मगो आमदारांनी व्यक्त केल्याने मतमोजणीपूर्वीच सरकार स्थापनेसंदर्भात हालचालींना सुरवात झाल्याचे हे संकेत आहेत. माझे त्यांच्यासोबत 1980 पासूनचे नाते आहे. त्यांचे वडील प्रतापसिंह राणे यांच्याशी जुनी मैत्री आहे, असे स्पष्टीकरण पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या एका प्रश्‍नावर दिले. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून संभाव्य विजयी उमेदवारांशी संपर्क साधला जात आहे. आमदार फोडफोडीचे प्रकार रोखण्यासाठी पक्षांतर कायदा अधिक कडक करण्याची गरज आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात खंडपीठाने जो निवाडा दिला आहे, तो मान्य असून तो खिलाडूवृत्तीने घेतला आहे. मात्र, हा कायदा अधिक मजबूत करण्यासाठी त्यात दुरुस्ती करण्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती व निवडणूक आयोग या तिघांना लेखी पत्र पाठवणार आहे. राष्ट्रीय पक्षाकडून प्रादेशिक पक्षांना संपविण्याचे हे कारस्थान केले जात आहे. ही दुरुस्ती केल्यासच प्रादेशिक व छोट्या राजकीय पक्षांना संरक्षण मिळेल व लोकशाहीचा विजय होईल, असे मत सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.

आगामी सरकार स्थापन करताना राजकीय पक्षांनी विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. या निवडणुकीत सरकार पक्षाची वाताहात झाली आहे. लोकांनी यावेळी परिवर्तन केले आहे. लोकांना सत्ताधारी पक्ष नको आहे, ज्यांनी माकडउड्या मारल्या त्यांना बाजूला केले आहे व ज्या राजकीय पक्षांनी अपक्ष उभे केले आहे त्यांना मते न घालण्याचे ठरवून मतदान झाले आहे. राज्यात परिवर्तन हे नक्कीच होणार आहे. माकडउड्या मारणारे यावेळी घरी जातील व पक्षप्रेम असलेले उमेदवार पुढे जातील. भाजप सरकारचे दिवस संपलेत व मुख्यमंत्र्यांनाही लोकांनी घरचा रस्ता दाखवलेला आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.

बंदर मर्यादेमुळे आता मांडवी व झुआरी नदीच्या किनारपट्टीपासून 500 मीटर अंतराच्या क्षेत्रात राज्य सरकारचा (State Government) अधिकार राहिलेला नाही व परवानगीसाठी मुरगाव बंदर अधिकारिणीकडे अर्ज करण्याची गरज भासणार आहे. या क्षेत्रावर या अधिकारिणीची मालकी असेल त्याचा मगोतर्फे निषेध करण्यात येत असल्याचे ढवळीकर म्हणाले.

Sudin Dhavalikar
Goa Assembly Election: गोव्यात त्रिशंकू विधानसभेचे संकेत

राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असताना पोलिस खात्यात भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत असे ऐकिवात आहे. उमेदवारांच्या भवितव्याशी सरकारने खेळू नये. जोपर्यंत ही आचारसंहिता संपत नाही, तोपर्यंत ती सुरू न करण्याचा इशारा मगोतर्फे देण्यात येत आहे.

‘टपाल मतदान प्रक्रिया रद्द करा’

टपाल मतांसाठी उमेदवारांकडून दबावतंत्र सुरू असल्याचे आरोप मंत्र्यांवर होत आहेत. त्यामुळे ही टपाल मतदान प्रक्रिया रद्द करून प्रत्येक तालुक्यातील मतदारसंघातील मतदान यंत्रे मामलेदार कार्यालयात उपलब्ध करण्यात यावीत व या मतदारांना मतदान करण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात यावी. तसे केल्यास जो आरोप मंत्र्यांवर व निवडणूक आयोगावर (Election Commission) होत आहेत ते बंद होतील, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com