Luizinho Faleiro
Luizinho FaleiroDainik Gomantak

तृणमूल काँग्रेस नेते लुइझिन फालेरोंनी भाजप आणि काँग्रेसवर साधला निशाणा

गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत युती करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही
Published on

राज्यसभा खासदार लुइझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी आज गोवा 'टीएमसी' आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) सोबत केलेल्या युतीबद्दल भाजपच्या टिप्पणीबद्दल टीका केली. 'टीएमसी आणि एमजीपीची संस्कृती जुळत नाही' अशी टिप्पणी करणारे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर प्रत्युत्तर देताना लुईझिन फालेरो म्हणाले, 'सत्तेत येण्यासाठी मगोपचा वापर करून त्यांच्या दोघां आमदारांना लुटून मगोपचा विश्वासघात करणे ,आणि मग त्यांना पूर्णपणे टाकणे ,ही भाजपची संस्कृती होती का? '

पत्रकार परिषदेत फालेरो यांनी अखिल भारतीय काँग्रेस (congress) चे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांना गोवा फॉरवर्ड सोबत कॉंग्रेसच्या कथित युतीबद्दल गोंधळात टाकणार्‍या टिप्पण्यांबद्दल प्रश्न केला.

Luizinho Faleiro
Goa: मंत्री गोविद गावडे भाजपात जाणार?

'गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत युती करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही' या श्री गुंडू राव यांच्या 30 नोव्हेंबरच्या विधानाचा संदर्भ देत फालेरो म्हणाले, 'त्यांनी फक्त हात वर केले. हस्तांदोलन झालेले नाही. त्यांनी आपल्या आमदारांची काळजी करावी आणि गोवा फॉरवर्ड सोबत प्रत्यक्ष युती झाली आहे की नाही यावर स्वच्छ, स्पष्ट, निश्चित विधान करावे. गोव्यातील जनतेसमोर काँग्रेसने स्वच्छ येण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com