ज्या वेगाने पंतप्रधानांचं हेलिपॅड बनलं, त्याच वेगाने गोव्याचा विकास करु : केजरीवाल

केजरीवाल यांनी लोकांना 'आप'ला (AAP) बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
Arvind Kejriwal in a press conference
Arvind Kejriwal in a press conference Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसाठी 24 तासात हेलिपॅड बनवले जाते, मात्र त्याच्या बाजूला असलेल्या बस स्टँडचे काम मागील 20 वर्षांपासून खोळंबले आहे. यातून सिद्ध होते की गोवा सरकार फक्त व्हीआयपी लोकांसाठी तत्परतेने काम करते. आम्ही सत्तेत आल्यास गोव्याची (Goa) जनता व्हीआयपी असेल, असे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. ते गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Arvind Kejriwal in Goa)

Arvind Kejriwal in a press conference
भाजप आणि कॉंग्रेसचे स्थानिक नेते उत्पल पर्रीकरांच्या पाठिशी

भाजपवर बोचरी टीका करत केजरीवाल म्हणाले, भाजप सरकारने ज्या वेगाने हेलिपॅड बनवले त्याच वेगाने आम्ही शाळा, रस्ते आणि दवाखाने बनवू. या निवडणुकीचे निकाल गोव्याचे भविष्य ठरवणार आहेत. तुम्ही कॉंग्रेसला (Congress) 25 वर्षे सत्ता दिली. भाजपला 15 वर्षे गोवा चालवण्याची संधी दिली. मात्र, या दोन्ही पक्षांनी तुमची निराशा केली आहे. आता एक संधी ‘आप’ला द्या, असे केजरीवाल म्हणाले.

Arvind Kejriwal in a press conference
भाजपकडून पैसे घ्या, पण मत मात्र तृणमूल काँग्रेसलाच द्या: अभिषेक बॅनर्जी

दरम्यान, केजरीवाल यांनी कॉंग्रेस आणि भाजपवर निशाणा साधला. कॉंग्रेसला मत देणे म्हणजे भाजपला मत दिल्यासारखे आहे, असे ते म्हणाले.

केजरीवाल यांनी लोकांना 'आप'ला (AAP) बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आम्ही काम केले नाही तर पुढील निवडणुकीत आम्हाला मत देऊ नका. आम आदमी पार्टी गोव्याला पहिले इमानदार सरकार देईल, याची मी तुम्हाला खात्री देतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com