पणजी: विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election) पार्श्वभूमीवर घाऊक पक्षांतराला वेग आला आहे. कॉंग्रेसचे (Congress) दार ठोठावलेल्या पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी काल बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र सभापती राजेश पाटणेकर यांना सादर केले. आज गुरुवारी ते भाजपात (BJP) प्रवेश करणार आहेत.
दीड महिन्याभरापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना कॉंग्रेसमध्ये पाठवून रोहन खंवटे यांनी राजकारणाची दिशा बदलली होती. मात्र, योग्य वागणूक मिळत नसल्याच्या ठपका ठेवत त्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला. दुसरीकडे खंवटे यांनी भाजपबरोबरची बोलणी सुरू ठेवली होती, याची कुणकुण कॉंग्रेसला लागली होती. शिवाय पर्वरी कॉंग्रेस गटमंडळानेही खंवटे यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा कॉंग्रेस प्रवेश लांबला होता. अखेर भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी खंवटे यांच्या भाजपप्रवेशाला हिरवा कंदील दाखवल्याने ते आता प्रवेश करणार आहेत.
आता पक्षीय राजकारणात
खंवटे यांनी 2012च्या आणि 2017च्या विधानसभा निवडणुका अपक्ष म्हणून पर्वरी मतदारसंघातून लढवल्या होत्या. यात त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने जिंकल्या होत्या. आता 2022 च्या विधानसभा निवडणुकीची परिस्थिती बदलत असून, हा मतदारसंघ अधिकच क्रियाशील आणि संमिश्र मतदारांचा बनल्याने खंवटे यांना राजकीय पक्षाची गरज भासू लागल्याने त्यांनी पक्षीय राजकारणाचा पर्याय निवडला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.