15 मार्चपूर्वी गोवा विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार!

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र आणि निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि अनुप चंद्र पांडे यांनी मंगळवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यातील तयारीचा आढावा घेतला.
Goa Assembly Election

Goa Assembly Election

Dainik Gomantak 

Published on
Updated on

Goa Assembly Election : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र आणि निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि अनुप चंद्र पांडे यांनी मंगळवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यातील तयारीचा आढावा घेतला. दरम्यान निवडणूक आयोगाच्या पथकाने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>Goa Assembly Election</p></div>
...त्यामुळे काँग्रेसमध्येच राहूनच सरकार स्थापित करणार!

15 मार्च 2022 रोजी राज्य विधानसभेचा कार्यकाळ संपतो. त्याअगोदर विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईल. 5 जानेवारीपर्यंत मतदार याद्या तयार होतील. 60 नवी मतदानकेंद्रे वाढणार. 100 मतदानकेंद्रे महिला, तर 4-5केंद्रे दिव्यांग कर्मचारी हाताळतील; मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा

80 वर्षांवरील मतदारांना घरातून मतदान करण्याची मोकळीक मिळणार. त्यासाठी वेगळी व्यवस्था करणार. राज्यात असे 30 हजारांहून अधिक मतदार आहेत. निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलणार; सुशील चंद्रा

गोवा विद्यापीठाच्या (Goa University) सहकार्याने डिझाइन केलेले आणि आयोजित केलेले 'भारतातील लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन' या विषयावर ऑनलाइन अभ्यासक्रम तसेच मतदान अधिकाऱ्यांसाठी 'बूथ इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन (BEMP)' पोर्टल सुरू केले आहे. वेबकास्टिंग फीडमधून रिअल टाइम माहिती मिळवण्यासाठी तसेच मतदान केंद्रांमधील गर्दीचा मागोवा घेण्यासाठी आणि मतदारांची मोजणी करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेली वेबकास्टिंग डेटा अॅनालिटिक्स प्रणाली देखील सुरू करण्यात आली.

थोडक्यात आढावा

  • 5 जानेवारीपर्यंत मतदार याद्या तयार

  • 60 नवी मतदानकेंद्रे वाढणार

  • 100 मतदानकेंद्रे महिला, तर 4-5 केंद्रे दिव्यांग कर्मचारी हाताळणार

<div class="paragraphs"><p>Goa Assembly Election</p></div>
कार्लुस आल्मेदा झाले 'कॉंग्रेसवासी'

गोवा फॉरवर्ड पार्टीचे (Goa Forward Party) सरचिटणीस दुर्गादास कामत म्हणाले की, त्यांच्या संघटनेने बैठकीत ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या हंगामात निवडणूक आचारसंहिता लागू करू नये, कारण त्याचा व्यवसायावर विपरित परिणाम होईल, असे EC ला सांगितले. दरम्यान ते असेही म्हणाले की GFP ने EC ला सूचित केले आहे की सध्या राज्य सरकारी विभागांमध्ये होत असलेली भरती ही लोकांना सत्ताधारी भाजपला (BJP) मत देण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या हालचाली म्हणून पाहिली पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com