Goa Election: राहुल गांधी आज गोवा दौऱ्यावर; साखळी मतदारसंघात घेणार सभा

राहुल गांधी यांची सभा मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात शुक्रवारी 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता पालिका मैदानावर आयोजित केली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Dainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: कॉग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे गोव्यात येत असून, त्यांची गोव्यातील सभा मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात शुक्रवारी 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता साखळी येथील पालिका मैदानावर आयोजित केली आहे. राज्यातील चाळीसही मतदारसंघासाठी ते आभासी पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत. सभेला प्रत्येक मतदारसंघातून पाचशे लोक या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी माहिती कॉग्रेसचे निरिक्षक दिनेश गुंडुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Rahul Gandhi Goa Visit)

Rahul Gandhi
..म्हणून 'आप'च्या नावेलीतील उमेदवार कुतिन्हो पत्रकार परिषदेत भावनाविवश झाल्या

यावेळी कर्नाटक प्रदेश युवा काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवासन, काँग्रेसचे प्रभारी रवी, उमेदवार धर्मेश सगलानी, माजी आमदार प्रताप गावस, माजी सरपंच प्रवीण ब्लेगन, साखळीचे नगराध्यक्ष राया पार्सेकर, उपनगराध्यक्ष राजेश सावळ, प्रदेश काँग्रेस सचिव अनंत पिसुर्लेकर, साखळी युवा काँग्रेस अध्यक्ष रियाज सय्यद, काँग्रेस साखळी गटाध्यक्ष मंगलदास नाईक, सूर्यकांत गावडे, गौतम भगत, सुबोध आमोणकर उपस्थित होते.

फेसबूक (Facebook) यावरूनही या सभेचे आंतरराष्ट्रीय थेट प्रेक्षेपण लाखो लोकांपर्यंत जाणार असून, यावेळी काँग्रेस राष्ट्रीय नेते पी. चिदंबरम, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर उपस्थित राहणार असल्याचे गुंडुराव म्हणाले. या सभेत राहुल गांधींच्या हस्ते काँग्रेसचा राज्यातील जाहीरनामाही प्रकाशित होईल.

Rahul Gandhi
पणजी पोलीस ठाण्यावरील हल्ला प्रकरणाची सुनावणी 17 फेब्रुवारीपर्यंत स्थगित

काँग्रेसच करून दाखवेल बदल

राज्यात पुन्हा सत्तेवर येत असल्याने काँग्रेस कार्यकत्यांमध्ये उत्साह आहे. राहुल गांधीच्या सभेमुळे संपूर्ण राज्यातील काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यामधील हा उत्साह, जोम येत्या आठ दिवसांत अधिक वाढणार आहे. भाजप सरकारला लोक कंटाळले आहेत. भाजपला हरविण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्येच आहे व म्हणूनच पुन्हा एकदा काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. या सभेला 'निर्धार' असे नाव दिले आहे. आम्ही जे जाहिरनाम्यात वचन देणार आहोत ते करून दाखवणार आहोत. लोकांना बदल हवा आहे व हा बदल केवळ काँग्रेसच देऊ शकेल हे राहुल गांधी पटवून देतील, असे दिनेश गुंडुराव म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या पराभवाचा इतिहास पुन्हा घडेल

गुंडुराव म्हणाले, गत निवडणुकीला गोव्याच्या भाजप मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस उमेदवाराने पराभव केला होता. यंदाही मुख्यमंत्र्यांचा पराभव होऊन पुन्हा एकदा इतिहास घडणार आहे. धर्मेश सगलानी मंत्री बनून मुख्यमंत्री करू न शकलेला साखळीचा विकास करणार आहेत.

साखळीत औद्योगिक वसाहत उभारू

भाजपने (BJP) लोकांची फसवणूक केली. दहा वर्षे खाण व्यवसाय सुरू केला नाही. बेरोजगारी वाढवली. भरमसाट पाणी व विजेची बिले लोकांच्या माथी मारली, महागाई वाढवली. लोकांना बदल हवा आहे व लोकांनी बदल करण्याचा निश्चित केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांचे सर्व सोपस्कार पुन्हा पार पाडले जातील. साखळी मतदारसंघात औद्योगिक वसाहत व हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज सुरू करणार असल्याचे उमेदवार धर्मेश सगलानी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com