गोवा: गोवा विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. भाजपने अखेर आज आपला जाहीरनामा सादर केला आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा जाहीरनामा सादर केला असून, आज भाजपचे जायताचे गाणे देखील त्यांच्या हस्ते सादर करण्यात आले. (pramod sawant's statment against AAP and TMC during BJP Manifesto Meeting)
सभेदरम्यान (CM Pramod Sawant) प्रमोद सावंत यांनी जनतेशी संवाद साधला; ते म्हणाले मिशन 2022 साठी आज आम्ही जाहीरनामा सादर करत आहोत. हा जाहीरनामा (Goa BJP Manifesto) जनतेची मते विचारात घेऊनच करण्यात आला आहे. तसेच भाजपने 2019 दिलेल्या जाहीरनाम्यापैकी 80% कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
तसेच आप (Goa AAP) आणि टीएमसीवर (TMC Goa) निशाणा साधत ते म्हणाले, सध्या राज्यात अनेक पक्ष येत असून, त्यांनी त्यांचे जाहिरनामे या पूर्वीच सादर केले आहेत. त्याचा भाजपवर फारसा परिणाम होणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. जे आपला पक्ष राष्ट्रीय करू पाहत आहेत त्यातील एक पक्षाने लांबच लांब जाहिरनामे केले आहेत. तर दूसरा पक्ष हा टेकूच्या आधारावर सत्ता स्थापन करू पाहत आहे. त्यांची आणि भाजपची (Goa BJP) कधीच बरोबरी होऊ शकत नाही. ते पुढे म्हणाले, भाजपवर सतत टीका करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांना जाब विचारा की, 2012 मध्ये दिलेल्या आश्वासनांपैकी किती अश्वासने पूर्ण करण्यात आली आहेत आणि याच उत्तर कॉंग्रेसने द्यावे असे, जाहीर आवाहन त्यांनी केले. तसेच स्वयंपूर्ण गोव्यासाठी त्यांनी भाजपला निवडून देण्याचे जनतेला आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.