Goa Election 2022: भाजपचा जाहीरनामा सादर करताना तानावडेंना आली पर्रीकरांची आठवण

जाहीरनामा तयार करताना आम्ही जनतेच्या मते विचारात घेतली: तानावडे
Sadanand Sheth Tanavade
Sadanand Sheth TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ सर्व पक्षांनी आपला जाहीरनामा सादर केला आहे, सर्वांची उत्सुकता ठरलेला भाजपचा जाहीरनामा आज नितीन गडकरी यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला आहे. (Tanawade remembered Parrikar While presenting goa BJP manifesto)

Sadanand Sheth Tanavade
मांद्रेच्या विकासासाठी आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या: लक्ष्मीकांत पार्सेकर

पणजी (Panjim) येथे हा जाहीरनामा सादर झाला असून, सभेदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Sheth Tanavade) यांनी आज जनतेशी संवाद साधला दरम्यान ते म्हणाले, मागील दहा वर्षे भाजप सरकार राज्याची सेवा करत आहे. जनतेने दिलेल्या संधीच भाजपने सोन केलं असून, भाजप सरकारने राज्याला एक स्थिरता दिली आहे. भाजपने मनोहर पर्रीकरांची शिकवण आणि तत्वे जोपासत आज पर्यंन्त जनतेची निस्वार्थ सेवा केली आहे.

ते पुढे म्हणाले, आज भाजपचा जाहिरनामा (BJP Manifesto) सादर करण्यात येणार असून, हा जाहीरनामा करताना जनतेची मते विचारात घेण्यात आली आहेत. आम्ही जनतेच्या मतांना प्राधान्य दिले आहे; तसेच समृद्ध गोव्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे. दरम्यान नितीन गडकरी यांची मोठी मदत झाली असून, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा भाजप निवडून येणारे गुजरात नंतर गोवा दुसरे राज्य ठरणार आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की, या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com