पणजी : पणजी हा फार पूर्वीपासून काँग्रेसचा सर्वात दुखरी नस आहे, परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी अनेक वर्षांतील सर्वात वाईट असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपच्या मतांच्या विभाजनातून पक्षाला फायदा होईल अशी काँग्रेसला आशा होती, परंतु त्याऐवजी स्वतःची मते फुटली. काँग्रेसचे उमेदवार एल्विस गोम्स 2017 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत गिरीश चोडणकर यांच्या मतांचीही बरोबरी करू शकले नाहीत. गोम्स यांना 3,175 मते मिळाली आणि अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांच्या मागे 6,071 मते मिळाली आहेत.
1999 च्या निवडणुकीत काँग्रेसचे केशव प्रभू यांना 2,647 मते मिळाली होती, भाजपचे मनोहर पर्रीकर यांना 5,396 मतं मिळवत पणजीतून विजयी झाले होते. मतदार संघाच्या आकारमानामुळे कमी मतदान झाल्याचंही बोललं जात होतं. 2012 पर्यंत मतदारसंघांचा नवीन आराखडा अंमलात येईपर्यंत पणजी हा 15,000 पेक्षा कमी मतदार असलेला छोटा मतदारसंघ होता. 2012 मध्ये ही संख्या 21,355 मतदारांवर गेली. 2002 मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री असताना मनोहर पर्रीकर यांना निकराचा सामना करावा लागला होता. काँग्रेसचे रमेश सिलीमखान यांचा पर्रीकर यांच्याकडून 1300 पेक्षा कमी मतांनी पराभव झाला.
2017 च्या पोटनिवडणुकीत गिरीश चोडणकर यांनी पर्रीकरांच्या विरोधात उभे असताना 5,000 पेक्षा जास्त मते मिळवली होती. गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पर्रीकर गोव्यात परतले होते. राजधानी पणजीत काँग्रेसच्या कामगिरीने आणखी आशा वाढल्या होत्या.
मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या निधनाने रिक्त जागा निर्माण झाल्यानंतर मे 2019 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली. अतानासियो म्हणजेच 'बाबूश' मोन्सेरात, जे त्यावेळी काँग्रेसचे होते, त्यांनी 1989 मधील जे बी गोन्साल्विस यांच्या विजयानंतर प्रथमच राजधानी पणजीतत काँग्रेसला विजय मिळवून दिला, परंतु तोही अल्पकाळ टिकला. काही महिन्यांनंतर, जुलैमध्ये, मोन्सेरातसह इतर 9 काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
राजकीय निरीक्षकांच्या मते, 10 मार्चचे निकाल सूचित करतात की उत्पल यांनी भाजपच्या (BJP) मतांसह काँग्रेसची मते खाल्ली आणि गोम्सला तिसऱ्या स्थानावर ढकलले. उत्पल अनेक बूथमध्ये मोन्सेरात यांच्याशी अटीतटीच्या लढाईत गुंतले होते. गोम्स चार बूथमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यात यशस्वी झाले. गोम्स यांना पणजीत काँग्रेसने पूर्णपणे पाठिंबा दिला नाही हेही निकाल सूचित करतात. त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता. तिकिटाचे दावेदार माजी महापौर उदय मडकईकर यांनी उघडपणे गोम्स यांच्या विरोधात काम केले. त्यानंतरच्या निवडणुकीत गोम्स यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केल्यानंतर उदय मडकईकर, जे एकेकाळी मोन्सेरात यांच्या अगदी जवळ होते, त्यांनी मोन्सेरात यांच्याविरोधात दंड थोपटल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला. आपल्याला पक्षाचे तिकीट मिळेल या आशेने त्यांनी प्रचाराचा भाग म्हणून मोन्सेरात यांच्याविरोधात प्रचार केल्याचं बोललं जात आहे. माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, जे पणजीत तिकिटासाठी इच्छुक होते, त्यांनी गोम्स यांना उमेदवारी दिली तेव्हा उघडपणे बंडखोरी केली नाही, मात्र तरीही ते नाखूश होते, असा अंदाज काँग्रेसच्या गोटात व्यक्त केला जात आहे.
योगायोगाने, विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी प्रियंका गांधींनी पणजीत मतदारांशी संवाद साधला तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. पक्षाने मडकईकर किंवा फुर्तादो यांसारख्या स्थानिक उमेदवाराला उमेदवारी दिली असती तर पणजीत काँग्रेस जिंकली असती की नाही हे सांगणे कठीण आहे. मात्र पक्षाने नक्कीच चांगली लढत दिली असती अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे किमान काँग्रेसची मते तशी विभागली गेली नसती. भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी असूनही पणजीमध्ये पक्षाला 3000 हून अधिक मते मिळाली हे अत्यंत निराशाजनक आहे, असं कार्यकर्त्यांमध्ये बोललं जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.