गोव्यात मुख्यमंत्रिपदावरुन वातावरण तापलं, भाजपचं सूचक मौन

विश्वजीत राणेंचा प्रमोद सावंतांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध असल्याची चर्चा
CM Pramod Sawant
CM Pramod SawantTwitter/@Dr. Pramod Sawant
Published on
Updated on

पणजी : गोव्यात भाजपने विधानसभा निवडणूक जिंकली खरी, मात्र आठवडा होत आला तरी अजूनही सत्तास्थापनेला मुहूर्त सापडत नसल्याचं चित्र आहे. शनिवारी प्रमोद सावंतांनी आपला गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. मगोपच्या पाठिंब्यावरुन पक्षात मतभेद समोर येतानाच आता मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरुनही गटबाजी समोर आली आहे. भाजपने मात्र या सर्व घडामोडींवर सावध मौन बाळगलं आहे.

CM Pramod Sawant
भाजपचा सत्तास्थापनेचा दावा लांबणीवर, नेमकं कारण काय?

गोवा विधानसभा निवडणुकीत प्रमोद सावंतांनी कमी फरकाने का होईना मात्र साखळी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या (Congress) धर्मेश सगलानी यांनी प्रमोद सावंतांना काँटे की टक्कर दिल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. मात्र प्रमोद सावंतांची मतं घटण्यासाठी केवळ धर्मेश सगलानी किंवा काँग्रेस हेच एक कारण नाही. तर भाजपच्याच (BJP) विश्वजीत राणेंनी प्रमोद सावंतांचा केलेल्या विरोधी प्रचारही कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.

CM Pramod Sawant
गोव्यात मुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही अनिश्चितता

प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि विश्वजीत राणेंमधील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. भाजपकडून ते सोडवण्यावर कधी भरही दिला गेलेला नाही. मात्र आता हेच शीतयुद्ध भाजपच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. विश्वजीत राणेंनी याआधी अनेकदा दिल्लीला जाऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे. निवडणुकीच्या निकालानंतरही विश्वजीत राणे राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर जाऊन आले आहेत. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असला तरीही गोव्यात सत्तासंघर्ष पेटण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे राज्यासह केंद्रातील भाजप नेत्यांनीही या संघर्षावर सूचक मौन बाळगलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com