पर्रीकरांनी गोव्याला दिशा, तर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी सुशासन दिले: राजनाथ सिंग

मुरगाव तालुक्यातील भाजप उमेदवाराच्या वास्को मुरगाव पालिका समोरील जाहीर सभेत रक्षा मंत्री राजनाथ सिंग उपस्थित जनतेस संबोधित करताना बुधवारी बोलत होते.
Rajnath Singh
Rajnath SinghDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोवा प्रामाणिकतेचे दर्शन घडवणारे राज्य असून याच भूमीत मनोहर पर्रिकर सारखे सुपुत्र जन्माला आले. पर्रिकर यांनी राज्याबरोबर देशासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांच्या सारखे नेते देशाला लाभले हे आमचे भाग्य असून त्यांना आदरांजली वाहतो, असे केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. पर्रीकर यांनी गोव्याला दिशा दिली तर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गोव्याला चांगले प्रशासन दिले असल्याचे प्रतिपादन रक्षा मंत्री यांनी केले.

Rajnath Singh
गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गावर खड्डेच खड्डे

मुरगाव तालुक्यातील भाजप (BJP) उमेदवाराच्या वास्को मुरगाव पालिका समोरील जाहीर सभेत रक्षा मंत्री राजनाथ सिंग उपस्थित जनतेस संबोधित करताना बुधवारी बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी, मुरगावचे भाजप उमेदवार तथा आमदार मिलिंद नाईक, दाबोळीचे भाजप उमेदवार तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, कुठ्ठाळीचे भाजप उमेदवार नारायण नाईक, वास्को भाजप उमेदवार कृष्णा साळकर, मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, राज्य कार्यकारिणी सदस्य जयंत जाधव, मुरगावचे भाजप अध्यक्ष संजय सातार्डेकर,दाबोळीचे भाजप अध्यक्ष संदीप सुद, वास्को भाजप अध्यक्ष दीपक नाईक उपस्थित होते.

पुढे बोलताना रक्षामंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) म्हणाले की, गोव्यातील जनतेने माजी पंतप्रधान अटलजी यांना प्रमाणे प्रेम दिले त्याच प्रमाणे आता पंतप्रधान मोदी यांना देत आहे. कारण दोन्ही नेत्यांनी देशाला भ्रष्टाचार मुक्त सरकार दिले आहे. भाजपने देशाला चांगले प्रशासन व न्याय दिला असल्याने जम्मू काश्मीर 370 कलम काढून इतिहास घडविलेला असल्याचे रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी आवर्जून सांगितले.

Rajnath Singh
गोव्यात राजकीय पक्षांची धार्मिक, जातीय गणिते जुळवण्यासाठी धडपड

भारत देश संस्कृती पाळणारा असल्याने इतर राष्ट्रांनी हिंदुस्तानकडे पाहताना कमजोर समजू नये. कारण देश संरक्षण क्षेत्रात अग्रेसर होत चाललेला आहे. भारत देशाची जनता भाजपकडे विकास कामाच्या पक्ष म्हणून पाहत आहे. कारण देशाचे नेतृत्व मोदी यांच्याकडे असून त्याच्या मार्गदर्शनाखाली गोवा विकसित राज्य बनणार असे शेवटी यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी दीपक नाईक, नारायण नाईक, कृष्णा साळकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जयंत जाधव यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com