गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गावर खड्डेच खड्डे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक शाखेचे एसपी शेखर प्रभुदेसाई यांचे पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता यांना पत्र
Narendra Modi
Narendra Modi Dainik Gomantak

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेची समस्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. याबाबत वाहतूक शाखेचे एसपी शेखर प्रभुदेसाई यांनी पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता यांना पत्र लिहिले आहे.

Narendra Modi
गोव्यात राजकीय पक्षांची धार्मिक, जातीय गणिते जुळवण्यासाठी धडपड

या पत्रात प्रभुदेसाई यांनी नमूद केले आहे की, राष्ट्रीय महामार्ग (National Highway) आणि इतर रस्त्यांच्या काही भागांवर अनेक खड्डे आणि असमान पृष्ठभाग आहेत. गोव्यात (Goa) प्राचारासाठी येणारा नरेंद्र मोदी यांचा ताफा या रस्त्यांद्वारेच गोव्यात प्रवेश करणार आहे.

Narendra Modi
Goa Assembly Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर

गेल्या वर्षी खड्डेमय रस्त्यांवरून (Road) मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 1 नोव्हेंबर 2021 पर्यंत सर्व रस्ते दुरुस्त करून खड्डेमुक्त केले जातील, असे जाहीर केले होते. मात्र, राष्ट्रीय महामार्गावर अजूनही खड्डे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही. एअरपोर्ट जंक्शन, कुठ्ठाळी सर्कल, म्हापसा आदी ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com