पणजी : साखळी विधानसभेची निवडणूक लढवण्यापासून भाजप सरकार आपल्यासमोर एफआयआर नोंद करून भीती आणि अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आपण घाबरत नाही आणि तुरुंगातूनही जिंकण्याची क्षमता आपल्यात आहे, असे येथील काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांनी शनिवारी सांगितले. (Defeat BJP In The Forthcoming Assembly Elections For The Future Of Goa Said Dharmesh Sagalani)
सगलानी यांनी शनिवारी पणजी येथे पत्रकार परिषद घेवून सांगितले की, काँग्रेस (Congress) पक्षाने उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर काणकोण पोलिस स्थानकात खोट्या तक्रारीवर एफआयआर दाखल केला. “मला अशा खटल्यांची भीती वाटत नाही. भाजपने मला तुरुंगात पाठवले तरी मी निवडून येईन. आम्ही कधीच सूडाचे राजकारण केले नाही, पण पराभवाची भीती असल्याने भाजप (BJP) हे करत आहे.’’ असे सगलानी म्हणाले.
मतांचे विभाजन करून भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा करू नका, असे आवाहन त्यांनी राजकीय पक्ष आणि इच्छुकांना केले आहे. “मुख्यमंत्र्यांचे समर्थक साखळीमध्ये दादागिरी करत आहेत. मी गोव्यातील लोकांना आवाहन करतो की त्यांनी काँग्रेसला मदत करावी आणि गोव्यासाठी चांगला बदल घडवून आणावा.’’ असे सगलानी म्हणाले.
'भाजपने खोटी आश्वासने देण्याशिवाय काहीच केले नाही. तीस हजार नोकऱ्या देण्याचे आणखी एक खोटे आश्वासन दिले होते. भाजपला कोणतीही योजना बंद करण्याचा अधिकार नाही, परंतु लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’’ अशी खंत सगलानी यांनी व्यक्त केली.
सगलानी म्हणाले की, खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात भाजप अपयशी ठरल्याने खाण अवलंबितांचे हाल होत आहेत. "भाजपने काहीही केले नाही, पण महागाई वाढवली आणि गोव्यातील लोकांना प्रत्येक क्षेत्रात त्रास सहन करावा लागला." असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असून त्यांच्या ओएसडीने अलीकडेच एका कंत्राटदाराला मारहाण केली असे ते म्हणाले. साखळी काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष जरीना शेख म्हणल्या की अल्पसंख्यांक समुदाय धर्मेश सगलानी यांच्यासोबत असून त्यांच्या विजयासाठी आशावादी आहेत. “आम्ही सर्व (Minority) धर्मेश सगलानी आणि काँग्रेससोबत आहोत. सगलानी निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे.” असे ती म्हणाली.
रियाझ खानच्या भाजपमध्ये प्रवेशावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री प्रमोद सावंतकाही महिन्यापासून त्यांच्यावर दबाव घालत होते. "रियाझ एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता आहे आणि मला खात्री आहे की तो आमच्यासोबत असेल." असे शेख म्हणाल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.