देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडत आहेत, आज उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे, तर उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व जागांवरती मतदान होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करून लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. पंतप्रधान म्हणाले, 'उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीसह, आज उत्तराखंड आणि गोव्याच्या सर्व विधानसभा जागांसाठी (Goa Assembly Election 2022) मतदान पार पडत आहे. मी सर्व मतदारांना विनंती करतो की, लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा, लक्षात ठेवा आधी मतदान, मग दुसरे काम!'
उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी मतदान होत आहे. तर उत्तराखंडमधील सर्व 70 आणि गोव्यातील 40 जागांसाठी मतदान पार पडत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून कडक सुरक्षेची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आजच्या मतदानात तीन राज्यांतील एकूण 165 विधानसभा जागांवर 1519 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत, तर उत्तर प्रदेशात सुमारे 2.2 कोटी लोक मतदानाचा हक्क बजावतील.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सभांना संबोधित करत आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून पीएम मोदी आज जालंधरमध्ये रोलीला संबोधित करणार आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. पंजाबमधील विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे, तर राज्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसने 77 जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले आणि 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या SAD-BJP सरकार पलटवले.
5 जानेवारी रोजी पंजाबमध्येच पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये त्रुटी आढळून आली होती, काही आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांचा मार्ग रोखला होता, त्यामुळे पंतप्रधान पंजाबमधील फिरोजपूरला जाऊ शकले नाहीत. ते 15-20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडले होते. नंतर हे प्रकरण चांगलेच तापले, यावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका देखील दाखल करण्यात आली होती. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारमधील (State Government) नेत्यांमधील शाब्दिक हल्ले तीव्र झाले. अशा परिस्थितीत पंतप्रधानांचा आजचा पंजाब दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.