पणजी : मगोपचे ज्येष्ठ नेते आणि मडकईचे आमदार सुदिन' ढवळीकर यांनी बाबूशच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पणजीचे भाजप आमदार बाबूश उर्फ अतानासिओ मोन्सेरात यांनी मगोपवर निशाणा साधला होता. जर मगोपला सरकारला बळकटी देत सत्तास्थापनेत सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावं असं थेट आव्हान बाबूशनी ढवळीकरांना दिलं होतं. आता सुदिन ढवळीकरांनी विलीनिकरण कोणत्याही परिस्थितीत करणार नसल्याचं सांगत बाबूशना जशास तसं उत्तर दिलं आहे.
मगोपने सरकारमध्ये येऊन भाजपचा फायदा घेऊ नये आणि नंतर कार्यकाळ संपल्यावर कोलांट्याउड्या मारु नये. मला इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, म्हणून मगोपला विरोध करत असल्याचं बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केलं आहे. जर तुम्हाला सरकारमध्ये यायचं असेलच तर चला एका कुटुंबाचा भाग होऊ या. तुम्हाला सरकारचा भाग व्हायचे आहे, मग या आणि भाजपमध्ये विलीन व्हा, असं थेट आव्हान बाबूश मोन्सेरात यांनी मगोपच्या सुदिन ढवळीकरांना दिलं होतं.
सरकार आणि गोवा बळकट व्हावे याविषयी मोन्सेरात यांचे काय म्हणणे आहे ते आम्ही ऐकले असले तरी, त्याबरोबरच लोकशाहीही मजबूत व्हायला हवी, असं मत सुदिन ढवळीकरांनी व्यक्त केलं आहे. गोव्यात जर लोकशाही मजबूत झाली नाही तर पक्षांतर पुन्हा सुरु होईल आणि मला ते थांबवायचे आहे, असंही ढवळीकर (Sudin Dhavalikar) म्हणाले. दरम्यान मगोपच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला विरोध करणाऱ्या भाजप आमदारांच्या एका गटाबद्दल विचारले असता ढवळीकर म्हणाले की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीसाठी मगोपशी संपर्क केला होता. त्यामुळे या विरोधाचा त्याचा त्यांना त्रास झाला नाही. जनतेने त्यांना 25 आमदारांसह बहुमत का दिले नाही? भाजपला बहुमत मिळाले असते तर सुदिन ढवळीकर आणि तीन अपक्ष आमदारांचा प्रश्नच निर्माण झाला नसता, असेही ढवळीकर म्हणाले.
जेव्हा मला भाजपचे (BJP) गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे फोन आले, तेव्हा मी लगेचच मगोपच्या (MGP) कार्यकारिणीसमोर ते मांडले. त्याच दिवशी मगोपने बैठक घेतली आणि भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. लोकशाही मजबूत करण्यासाठी नवीन अपात्रता कायदा अंमलात आला पाहिजे. जो उमेदवार आमदार झाल्यानंतर राजीनामा देईल, त्याला पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी ढवळीकर यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.