पणजी : गोवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सर्व नवनिर्वाचित आमदारांनी आज शपथ घेतली. काही आमदारांनी दुचाकीवर येत अनेकांचं लक्ष वेधलं तर सांत आंद्रेचे रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर यांनी तर बुलेटवरुन ग्रँड एंट्री घेतली. मात्र या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते विश्वजीत राणे आणि सुदिन ढवळीकरांच्या एकत्रित फोटोने.
शपथविधीवेळी काढलेल्या फोटोंमध्ये भाजपचे (BJP) विश्वजीत राणे आणि मगोपचे (MGP) सुदिन ढवळीकर अनेकवेळा एकत्र दिसले. काही वेळा तर या दोघांमध्ये चर्चाही होताना दिसली. गोव्यातील सद्यस्थिती पाहता मगोपला भाजप सोबत घेण्यास भाजपच्या अनेक आमदारांचा विरोध आहे. मात्र विश्वजीत राणे मगोपला सोबत घेण्याच्या बाजूने असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या युतीबाबतच दोघांमध्ये चर्चा झाली का असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
दरम्यान विश्वजीत राणेंची मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे प्रमोद सावंतांसमोर मात्र मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. जर मुख्यमंत्रीपदावर दावा करायचा असेल तर त्यासाठीचं गणित विश्वजीत राणे जुळवत होते का अशीही शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे मगोपला सरकारमध्ये (Goa Government) सामील व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावं असं वक्तव्य बाबूश मोन्सेरात यांनी केलं आहे. मात्र रवी नाईक यांच्यासह अनेक आमदारांनी मगोप-भाजप युतीला विरोध केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.