Goa Opinion Poll: उत्तर गोव्यातच भाजप अर्धी बाजी मारणार...!

सर्वात जास्त आणि व्हीआयपी जागा उत्तर गोवा विभागात आहेत
Goa Election 2022
Goa Election 2022Dainik Gomantak

पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकांना सुरुवात झाली असून त्यातील एक महत्त्वाचे राज्य म्हणजे गोवा (Goa Election 2022), जेथे सध्या भाजपचे (BJP) सरकार आहे. 14 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी मतदान होणार असून निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहेत. मात्र त्यापुर्वी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार गोव्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार आहे, मात्र बहुमतापासून लांब राहणार आहे.

DesignBoxed ने ZEE NEWS साठी एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात 10 लाखांहून अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. हे सर्वेक्षण 10 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आले आहे. हा फक्त एक ओपिनियन पोल आहे, ज्यामध्ये लोकांच्या मताचा समावेश करण्यात आला होता.

दोन भागांत गोव्याचे सर्वेक्षण

ओपिनियन पोलमध्ये नमुना सर्वेक्षणाचा आकडा ६ हजार ठेवण्यात आला असून गोव्यातील सर्व 40 जागांवरील आढावा घेण्यात आला आहे. हा पोल 4 जानेवारी ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आला आहे. गोव्यातील लोकांची मनःस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि प्रत्येक जागेचे अचूक विश्लेषण करण्यासाठी गोवा ओपिनियन पोलमध्ये राज्याचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे.

Goa Election 2022
दिग्गज नेते गळाला लागूनही गोव्यात तृणमूलची वाट बिकटच!

उत्तर गोव्यात कोण पुढे?

राज्याच्या उत्तर गोवा विभागात 23 जागा आहेत तर दक्षिण गोव्यात 17 जागा आहेत. सर्वात जास्त जागा असलेल्या आणि भरपूर व्हीआयपी जागा असलेल्या उत्तर गोव्यातून या मतदानाला सुरवात होणार आहे. उत्तर गोव्याचे मुख्यालय पणजी आहे. त्यात 23 जागा आणि 1 जिल्हा आहे. उत्तर गोव्यातील महत्त्वाच्या जागांबद्दल बोलायचे झाले तर मांद्रे, साळगाव, कळंगुट, पणजी, साखळी, वाळपई, फोंडा या मतदारसंघाचा समावेश आहे.

2017 मध्ये, उत्तर गोव्यात भाजपला 36 टक्के, काँग्रेसला 27 टक्के, आम आदमी पक्षाला 6 टक्के आणि इतरांना 31 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मात्र ZEE NEWS DESIGN BOXED च्या सर्वेक्षणानुसार, उत्तर गोव्यातील मतदानाचे निकाल काही वेगळेच सांगत आहेत.

उत्तर गोव्यात मागे कोण?

पोलनुसार, गोव्याच यावेळी भाजपची मतांची टक्केवारी 38 टक्के राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी काँग्रेसची मते 27 टक्के राहण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीची मतांची टक्केवारी 10 टक्के राहू शकते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष म्हणजेच MGP+ ला 10 टक्के मते मिळू शकतात. गोवा फॉरवर्ड पक्षाला 4 टक्के मते मिळू शकतात. तर इतर पक्षांना 11 टक्के मते मिळू शकतात. सर्वेक्षणानुसार, उत्तर गोव्यातील परिस्थिती बद्दल बोलायचे झाले तर भाजपचा मतसाठा 2 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या मतांमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि तो 27 टक्के राहिला आहे. आम आदमी पक्षाच्या मतांमध्ये 4 टक्क्यांनी वाढ होत आहे, म्हणजेच आम आदमी पक्षाला सर्वाधिक फायदा उत्तर गोव्यात होतांना दिसत आहे. इतर पक्षाचे 6 टक्के मतदार कमी होण्याची शक्यता आहेत.

कोणाला किती जागा मिळणार?

विधानसभा जागांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, 2017 मध्ये उत्तर गोव्यात भाजपला 8 जागा, काँग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या तर आम आदमी पार्टीला एकही जागा मिळाली नव्हती, इतर पक्षांना 6 जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी सर्वेक्षणानुसार उत्तर गोव्यात भाजपला 9-11 जागा मिळू शकतात, काँग्रेसला 8-10 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर आम आदमी पार्टीला एकही जागा मिळणार नाही असे दिसत आहे. तर तृणमूल आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष म्हणजेच TMC+MGP ला 2-4 जागा मिळू शकतात. गोवा फॉरवर्ड पक्षाला आणि इतर पक्षाला एक एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर गोव्यात कोणता पक्ष किती जागा गमावणार आहे, हेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भाजपला1-3 जागांचा फायदा होवू शकतो. काँग्रेसला 1 जागा मिळू शकते किंवा 1 जागा कमी होऊ शकते. आम आदमी पक्षाच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही, उत्तर गोव्यात अद्यापतरी 'आप'ला एकही जागा जिंकता आलेली नाही.

Goa Election 2022
Goa Election:....तर तृणमूल कॉंग्रेसला नक्कीच फायदा झाला असता: लुईझिन फालेरो

मुख्यमंत्री पदाचा आवडता चेहरा कोण?

उत्तर गोव्यातील 34 टक्के लोक भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पसंत करतात. भाजपचे विश्वजित राणे यांना मुख्यमंत्री म्हणून 13 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. काँग्रेसचे दिगंबर कामत यांना मुख्यमंत्री म्हणून 25 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. 8 टक्के लोकांना आम आदमी पार्टीचे अमित पालेकर मुख्यमंत्री म्हणून आवडतात. तर 20 टक्के लोकांना मुख्यमंत्री म्हणून इतर नेत्यांकडे आपला कल दर्शविला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com