Goa Election:....तर तृणमूल कॉंग्रेसला नक्कीच फायदा झाला असता: लुईझिन फालेरो

तृणमूल कॉंग्रेस नेते अ‍ॅड यतीश नाईक यांनी पक्षाने जाहीर केलेल्या यादीत नाव नसल्याने नाराजी व्यक्त करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि पक्ष देखील सोडला.
Luizinho Faleiro
Luizinho FaleiroDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य लुईझिन फालेरो यांनी पक्षाने तिकीट नकरलेल्या 2 नेत्यांबद्दल सूचक विधान केले. टीएमसीच्या गोवा प्रभारी महुआ मोईत्रा आणि टीएमसी नेते चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत फालेरो बोलत होते. (TMC Goa Election News)

Luizinho Faleiro
Goa:....म्हणून प्रतापसिंह राणे यांनी निवडणुकीतून माघार घेतली: दिनेश राव

फालेरो म्हणाले, पक्षाने दोन चांगल्या नेत्यांना उमेदवारी नाकारली. त्यांना उमेदवारी दिली असती तर त्याचा पक्षाला नक्कीच फायदा झाला असता. यातून लोकांपर्यंत संदेश पोचला असता की, तृणमूल तरुण आणि हुशार चेहऱ्यांना संधी देत आहे. लुईझिन फालेरो यांचा रोख अँटोनियो क्लोव्हिस दा कोस्टा आणि यतीश नाईक यांच्याकडे होता, असे राजनैतिक जाणकार सांगतात.

Luizinho Faleiro
Goa Election 2022: भाजपला 12 ठिकाणी बंडखोरी रोखण्यात यश

अँटोनियो क्लोव्हिस दा कोस्टा यांना वेळ्ळी मतदारसंघातून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती तर यतीश नाईक हे साळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आग्रही होते.

तृणमूल कॉंग्रेस (TMC) नेते अ‍ॅड यतीश नाईक यांनी पक्षाने जाहीर केलेल्या यादीत नाव नसल्याने नाराजी व्यक्त करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि पक्ष देखील सोडला. याबाबत त्यांनी टीएमसी अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे. आपल्याला डावलून पक्षात नवीन आलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन याद्या जाहीर होऊनही माझे नाव रोखून ठेवले आहे, असा आरोप यतीश नाईक (Yatish Naik) यांनी केला. अँटोनियो क्लोव्हिस दा कोस्टा यांनी पक्ष सोडला नसला तरी पक्ष सोडला नसला तरी त्यांची नाराजी उघडपणे दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com