जाणून घ्या गोव्यातील पक्षांचे आगामी निवडणुकीताल भविष्य?

राज्यातील 40 आमदारांपैकी 23 आमदारांनी 2017 ची निवडणूक ज्या पक्षातून लढवली होती त्या पक्षाला दिली सोडचिठ्ठी
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय जनता पक्ष (BJP) यावेळी गोवा विधानसभेची निवडणूक सत्ताविरोधी लाटेत आणि आपले सर्वात मोठे नेते मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत लढणार आहे. गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होत आहे आणि 2017 मध्ये निवडून आलेल्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपत आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी अनेक नेत्यांनी पक्ष बदलला. पक्ष बदलणारे बहुतांश आमदार काँग्रेसचे होते, ज्यांना भाजपमध्ये आपले भविष्य उज्ज्वल दिसत होते.(what is future of parties in Goa in upcoming Assembly elections 2022)

Goa Assembly Election 2022
परत जायला मी काय मोदी आहे? खरी कुजबूज!

याशिवाय तृणमूल काँग्रेस (TMC) , गोवा फॉरवर्ड पार्टी (Goa Forward) आणि महाराष्ट्रवादी गोमंतक (MGP) पक्ष हेही असे पक्ष होते, जेथून अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर भाजपमधून बाहेर पडलेल्यांमध्ये एकच नाव समाविष्ट आहे, ते म्हणजे अलिना साल्डाणा यांचे. भाजपमधील (BJP) मतभेदानंतर साल्डाणा यांनी पक्षाचा निरोप घेतला आणि केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षात प्रवेश केला. मातत्र आता भाजपचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे सदस्य गजानन तिळवे यांनी आज कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे दोन सदस्य आता पक्षाबाहेर पडल्याने गोव्यातील राजकीय वातावरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

40 पैकी 23 आमदारांनी बदलला पक्ष

गोव्याचे राजकारण गेल्या पाच वर्षांपासून गोंधळात असल्याचे दिसत आहे. राज्यातील 40 आमदारांपैकी 23 आमदारांनी 2017 ची निवडणूक ज्या पक्षातून लढवली होती त्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. 2017 मध्ये गोवा विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवारांनी 17 जागा जिंकल्या होत्या. तर 13 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. 2017 मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MPG), गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) आणि दोन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने भाजपने 21 जागांवर आपली ताकद निश्चित केली आणि सरकार स्थापन केले होते.

Goa Assembly Election 2022
गोवा निवडणुकीत अपक्षांची भूमिका काय असणार?

बहुमत असूनही काँग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही

त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 17 मार्च 2019 रोजी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. यानंतर पक्षाने प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवले. गोव्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला. गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल आणि 3 जागा मिळविलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या आणि इतर लहान पक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता काबीज करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण हे होऊ शकले नाही. कारण काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाची युती त्यावेळी होऊ शकली नाही.

काँग्रेस 5-6 जागा कमी होऊ शकते

शक्यतांबाबत बोलायचे झाले तर आम आदमी पक्ष हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असल्याचे दिसते. आज आम आदमी पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये 10 उमेदवारांची नाव घोषित करण्यात आली. दुसरीकडे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ज्यामध्ये मडगाव मतदार संघातून काँग्रेस नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसने एकूण 40 जागांपैकी पहिल्या यादीत आपले 8 उमेदवार जाहीर केले आहेत. यावेळी काँग्रेसच्या 5-6 जागा कमी होऊ शकतात, असा अंदाज राजकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसही यावेळी गोव्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. गोव्यात गेल्या 10 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र, यावेळी कोणाच्या नशिबात गोव्यात मुकुट असणार आणि कोणाच्या गळाला मासा लागणार हे जनताच ठरवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com