मुख्यमंत्र्यांकडून 1686 कोटींचा खाण घोटाळा : काँग्रेस

पराभवाच्या भीतीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप
Girish Chodankar in Congress Press Conference
Girish Chodankar in Congress Press ConferenceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : भ्रष्ट आणि असंवेदनशील भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पराभवाच्या भीतीने काँग्रेस उमेदवारांना त्रास देऊन सूडबुद्धीचे राजकारण करत असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी केला. प्रमोद सावंत यांनी 1686 कोटी रुपयांचा खाण घोटाळा केला आहे. अमित शहा यांच्या गोवा दौऱ्यावेळी आम्ही याचा पर्दाफाश करु. याशिवाय, त्यांनी मिलिंद नाईक यांना सेक्स स्कँडल प्रकरणात क्लीन चीट का दिली आणि कोविडच्या काळात केलेला भ्रष्टाचार देखील आम्ही उघड करु, असेही चोडणकर म्हणाले. (Girish Chodankar Congress News Updates)

Girish Chodankar in Congress Press Conference
फातोर्ड्यात दामू आणि विजय पुन्हा आमनेसामने

गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, प्रमोद सावंतांचे लक्ष केवळ भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर पैसा मिळवण्यावर राहिले आहे. आम्ही पक्षांतर केलेल्या आमदारांना तिकीट देणार नाही हे वचन पाळले आहे, तसेच गोव्यातील लोकांच्या मागणीनुसार जवळपास 80 टक्के नवीन आणि तरुण चेहरे दिले आहेत, असेही चोडणकर म्हणाले.

आम्ही गोव्यातील जनतेला वचन दिले होते की, आम्ही पक्षांतर करणाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणार नाही आणि ते आम्ही पूर्ण केले, असेही चोडणकर यांनी स्पष्ट केले.

Girish Chodankar in Congress Press Conference
बाणावलीतून चर्चिल तर नावेलीतून वालांकाची उमेदवारी दाखल

काँग्रेसचे 30 उमेदवार नवे चेहरे असून सुमारे 18 उमेदवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. 'लोकांची मागणी पूर्ण होत आहे. आम्ही आमचा शब्द पाळला आणि तरुण चेहरे दिले आहेत. उमेदवारी निवडताना आम्ही सर्व जाती-धर्म, व महिलांना प्रतिनिधित्व दिले आहे,' असेही चोडणकर म्हणाले.

गोव्यातील लोक या उमेदवारांना आशीर्वाद देतील आणि आपापल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना निवडून देतील, अशी आशा चोडणकर यांनी व्यक्त केली.

Girish Chodankar in Congress Press Conference
गोव्यात प्रचारावेळी बेळगावच्या नेत्याने मांडला अश्लीलतेचा बाजार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी पराभव मान्य केला आहे, त्यामुळे ते आमच्या उमेदवारांसमोर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सावंत हे साखळी मतदारसंघामधील आमचे उमेदवार धर्मेश सगलानी यांना घाबरतात आणि त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून त्यांच्यावर नको असलेला एफआयआर दाखल करत आहे. सावंत यांनी यापूर्वीच त्याच्याविरुद्ध दोन एफआयआर दाखल केले आहेत आणि आणखी एफआयआर होण्याची शक्यता आहे. जर त्याच्यात हिंमत असेल तर त्याने आणखी एफआयआर दाखल करू द्या आणि त्याला तुरुंगात पाठवू द्या. पण तरीही धर्मेश सगलानी साखळीतून जिंकणार, असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला.

Girish Chodankar in Congress Press Conference
TMC चे उपाध्यक्ष लुईझीन फालेरो यांच्या राजीनाम्याची अफवाच

वैफल्यग्रस्त झालेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत काँग्रेसचे (Congress) उमेदवार धर्मेश सगलानी यांना निवडणुकीत रोखण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांचा वापर करत आहेत. ते भाजपचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती करत आहेत. पार्सेकर यांच्याप्रमाणेच सावंत यांचाही पराभव होईल, असा निशाणा गिरीश चोडणकरांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी मिलिंद नाईक यांना सेक्स स्कँडल प्रकरणात क्लीन चिट दिली असली तरी त्यांच्या विरोधात सर्व पुरावे आहेत. याबाबत गोव्यातील लोक निर्णय घेतील आणि आम्ही न्यायालयातही जाऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Girish Chodankar in Congress Press Conference
विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यातून मोठा इतिहास घडवणार: दर्शना जरदोस

दयानंद सोपटे यांच्यावरील खंडणीच्या आरोपावर आणि उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी व्हायरल केलेल्या अश्लील व्हिडिओवर कारवाई करण्यात भाजप (BJP) सरकार अपयशी ठरले आहे. भाजप सरकार संकल्प आमोणकर, धर्मेश सगलानी आणि इतरांसमोर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही घाबरत नाही. लोकांनी भाजपच्या उमेदवारांना नाकारण्याचा निर्णय घेतल्याने आमचे उमेदवार विजयी होतील, असे चोडणकर म्हणाले.

साखळीमधील भाजपचे उमेदवार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत आणि त्यामुळे प्रमोद सावंत यांचा पराभव होणार हे स्पष्ट आहे. भाजप नेत्यांच्या नको त्या आदेशाला बळी पडू नका, असा इशारा त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. आम्ही सत्तेत आल्यावर या अधिकाऱ्यांवर कारवाई करु, असे वक्तव्यही चोडणकर यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com