पर्येत आम आदमी पक्षाला निवडणुकीपूर्वीच भगदड, अँड गणपत गावकर यांची सोडचिठ्ठी

विश्वजीत कृष्णाराव राणे यांचा मार्ग मोकळा, उमेदवारी मिळणार नसल्याने घेतला निर्णय, आज करणार तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश
होंडा येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले अँड गणपत गावकर, बाजूला  हेमंत पाटील, महेंद्र पाटील, लियाखत खान व विजयकुमार
होंडा येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले अँड गणपत गावकर, बाजूला हेमंत पाटील, महेंद्र पाटील, लियाखत खान व विजयकुमार Dainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात आम आदमी पक्षात पक्ष कार्य सुरू होण्यापूर्वीच फुट पडली असून, काही दिवसांपूर्वीच दिल्ली (Delhi) येथे जाऊन आम आदमी पक्षात प्रवेश केलेले गेल्या 16 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे (BJP) कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अँड गणपत गावकर यांनी आम आदमी पक्षाचा झाडू सोडून ममता दिदीचे फुल हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे व उद्या रोजी होंडा येथिल सुंदरम सभागृहात संपन्न होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या संबंधी सविस्तर माहिती देताना अँड गावकर यांनी सांगितले की गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात काम करीत असताना या भागातील प्रस्थापित राजकीय नेत्यांकडून प्रखर विरोध सहन केला आहे, तरी पण भारतीय जनता पक्षाचे कार्य सोडले नव्हते, परंतू या पक्षाची उमेदवारी सुद्धा सन 2007 सालाची विधानसभेची निवडणूक (election) वगळता एका वैशिष्ट्य समाजातील व्यक्तीला देण्यात आली, तरी पण हे सगळे सहन करून पक्षासाठी कार्य केले.

पुढे जाऊन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता सन 2017 सालाच्या विधानसभेच्या निवडणुकी नंतर वाळपई मतदार संघातून कॉंग्रेस (congress) पक्षाच्या चिन्हावर निवडणून आलेले विश्वजीत प्रतापसिंह राणे यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला. त्यावेळी पासून पर्ये मतदार संघात विरोधी पक्ष संपुष्टात आला. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांची भाजपाला कदर नसल्याचे दिसून आले. तरी पण गेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणूकीत आपल्या सारख्या बहुजन समाजातील जिल्हा पंचायतीची उमेदवारी द्यावी अशी गळ घातली, पण यावेळी सुद्धा पक्षाने मंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) यांचे समर्थक असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली.

होंडा येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले अँड गणपत गावकर, बाजूला  हेमंत पाटील, महेंद्र पाटील, लियाखत खान व विजयकुमार
उशाला कळसा तरीही पिसुर्ले वासीयांचा घसा कोरडा..!

यावेळी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सुमारे तीन हजारांच्या आसपास मते मिळवली होती. त्यामुळे या पुढे सुध्दा भारतीय जनता पक्ष आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांची कदर करणार नाही हे हेरून काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. पण त्या नंतर या पक्षात सुद्धा एका वैशिष्ट्य समाजातील व्यक्तीला प्रवेश दिला असल्याने या पक्षाची उमेदवारी सुद्धा त्यालाच मिळणार आहे हे लक्षात घेऊन आपले हितचिंतक तसेच कार्यकर्ते यांच्या सोबत बैठक घेऊन आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर प्रवेश प्रक्रिया उद्या रोजी होंडा येथिल सुंदरम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत पार पडणार आहे, यावेळी गोवा तृणमूल काँग्रेस पक्षाचे संयोजक तथा राज्य सभा खासदार लुईजन फालेरो हे नेते उपस्थित राहणार आहे. सदर पक्षात प्रवेश करताना पर्ये मतदार संघातील उमेदवारी विषयी खात्री करूनच पक्षात प्रवेश केला असल्याचे यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अँड गावकर यांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात संपन्न होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाची उमेदवारी अँड गणपत गावकर यांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान अँड गणपत गावकर हे बहुजन समाजातील नेते असल्याने त्याचा सर्व सामान्य जनतेशी चांगला संपर्क आहे त्यामुळे त्यांनी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असल्याने याचा फटका येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला बसण्याची दाट शक्यता आहे.

यावेळी त्यांच्या सोबत पत्रकार परिषदेला हेमंत पाटील, महेंद्र पाटील, विजयकुमार कुपल, लियकत खान, नासिर खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com