गोवा निवडणुकीच्या निकालाला काही तासच उरले असताना भाजप आमदारांची उच्चस्तरीय बैठक सुरु झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उद्या सरकार स्थापन करण्याच्या रणनीतीवर 40 उमेदवारांसोबत चर्चा करत आहेत. बैठकीत विद्यमान आमदारांसह त्या उमेदवारांचाही समावेश आहे, ज्यांना यावेळी पक्षाने तिकीट दिले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दयानंद रघुनाथ सोपटे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, काँग्रेसने आपल्या उमेदवारांना दोन दिवस हॉटेलमध्ये ठेवले आहे. सोपटे पुढे म्हणाले, “हायकमांडकडून आलेल्या सूचनांनुसारच आमदार आपला नेता निवडतील. गोव्यात गुरुवारी भाजप सरकार स्थापन करणार आहे.'' (Devendra Fadnavis is in talks with 40 candidates to establish power in Goa)
भाजप एमजीपीसोबत युती करु शकतो
भाजप सरकार स्थापन करण्यासाठी गोव्यातील राजकारणात किंगमेकरची भूमिका साकारत असलेल्या MGP सोबत युती करु शकतो. याशिवाय भाजप अपक्षांच्याही संपर्कात आहे. निवडणूक जिंकू शकणारे चार अपक्ष आहेत. त्यात उत्पल पर्रीकर आणि भाजपविरोधात बंड केलेले लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे दोघांचीही जिंकण्याची शक्यता आहे. जर ते जिंकले आणि भाजपला कदाचित बहुमत मिळाले नाही, तर या नेत्यांना मंत्रिपदाची ऑफर देऊन पुन्हा पक्षात समावेश करुन घेतले जाऊ शकते. दोघांनाही हव्या असलेल्या सीटवरुन तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे.
केवळ 13 जागा आणून सरकार स्थापन केले
2017 मध्ये भाजपला केवळ 13 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने 40 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या. असे असूनही काँग्रेसला (Congress) सरकार स्थापन करता आले नाही, कारण निकालाच्या वेळी नितीन गडकरी आणि अमित शहा यांनी गोव्यात दाखल होऊन प्रादेशिक पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते.
त्यानंतर काँग्रेसचे सुमारे 15 आमदारही भाजपमध्ये दाखल झाले होते. नितीन गडकरी यांचे एमजीपीसोबतचे मधुर संबंध असल्याचे बोलले जात आहे, त्याचा फायदा यावेळी भाजपला मिळू शकतो.
एक्झिट पोलमध्ये कोणालाच बहुमत नाही
मंगळवारी झालेल्या एक्झिट पोलमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. अशा स्थितीत दोन्ही पक्ष निकालापूर्वीच सक्रिय झाले आहेत. काँग्रेसने आपले सर्व उमेदवार दोन दिवस हॉटेल्समध्ये ठेवले असून पी चिदंबरम ते डीके शिवकुमार हे पणजीत तळ ठोकून आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.