काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीसाठी हाय होल्टेज बैठक दिल्लीत

मडगावाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे गोवा फॉरवर्ड व काँग्रेस नेत्यांची संयुक्त बैठक एका हॉटेलात झाली
Congress leaders meeting in Delhi for alliance with Goa Forward in state
Congress leaders meeting in Delhi for alliance with Goa Forward in stateDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात गोवा फॉरवर्ड (Goa Forward) आणि काँग्रेस (Congress) या पक्षात युती होणार की नाही यासंबंधी आता अंतिम निर्णय सोमवारी होणार असून यासंबंधी श्रेष्ठींकडे बोलणी करण्यासाठी गोव्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. (Congress leaders meeting in Delhi for alliance with Goa Forward in state)

मडगावाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे गोवा फॉरवर्ड व काँग्रेस नेत्यांची संयुक्त बैठक एका हॉटेलात झाली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिनेश राव यांनी आमची चांगली बोलणी झाली. ती फलदायी होणार अशी आशा आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. गिरीश चोडणकर यांनीही आम्ही सर्व एकत्र येऊन भाजप विरोधात कसे लढू शकू यावर बोलणी झाल्याचे सांगितले.तर विजय सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आम्ही जे काय ठरविले होते, त्याचा आदर राखण्यासाठी आम्ही आज चर्चेला आलो होतो. आम्ही आमचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडले आहे. आता जो काय निर्णय घ्यायचा आहे तो काँग्रेसला घ्यायचा आहे. चेंडू त्यांच्या कोर्टात आहे आम्ही सोमवारपर्यंत वाट पाहू, असे ते म्हणाले.आज झालेल्या चर्चेत काँग्रेसतर्फे राव, चोडणकर, कामत व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी भाग घेतला तर गोवा फॉरवर्डतर्फे विजय सरदेसाई, अकबर मुल्ला, दिलीप प्रभुदेसाई व मोहनदास लोलयेकर हे उपस्थित होते.

Congress leaders meeting in Delhi for alliance with Goa Forward in state
गोव्यात भाजपला सत्तेवरुन खाली खेचणार..!

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत सरदेसाई यांनी काँग्रेसने विनाविलंब युतीची घोषणा करण्याची गरज व्यक्त केली. राहुल गांधी यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत तसे ठरले होते हे स्पष्ट केले, तर काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतून कौल मिळाल्याशिवाय आम्हाला निर्णय घेता येणार नाही असे स्पष्ट केले. त्यानंतर दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटण्याचा निर्णय राव यांनी घेतला.

या बैठकीत युती करण्याच्या निर्णयावर औपचारिक सहमती दोन्ही बाजूंनी दाखविण्यात आली आहे. युती झाल्यास फातोर्डा, फोंडा, मये, मांद्रे, सांत आंद्रे, शिवोली आणि काणकोण या जागा गोवा फॉरवर्डला सोडाव्यात आणि शिरोड्यात गोवा फॉरवर्डचे अकबर मुल्ला यांना काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणुकीत उभे करावे हा प्रस्ताव सरदेसाई यांनी काँग्रेस समोर ठेवला आहे.सरदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले, आधीच उशीर झाला आहे, त्यामुळे या विषयी काँग्रेसने लवकर निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. हा विषय लटकवीत ठेऊ, नये असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com