संपूर्ण यात्रेतून ग्रामीण भागातील समस्या जाणून घेणार; श्रीधरन पिल्लई

धरणग्रस्तांची अजूनही परवड
Sreedharan Pillai
Sreedharan PillaiDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे : गोवा संपूर्ण यात्रा उपक्रमांतर्गत राज्याच्या विविध भागांना भेट देऊन येथील समस्या जाणून घेऊन सरकारमार्फत त्या सोडवल्या जातील, अशी ग्वाही राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी दिली.

राज्यपाल पिल्लई यांनी सपत्नीक सांगे भागाचा दौरा करून तेथील समस्या जाणून घेतल्या. जांबावलीत श्री रामनाथ दामोदराचे दर्शन घेतल्यानंतर रिवण येथील पांडवकालीन भूस्तर कोरीव कामाची त्यांनी पाहणी केली. त्यांनी उगे ग्रामपंचायतीला भेट दिली. साळावली विश्रामधामात विश्रांती घेतल्यानंतर थेट नेत्रावळीतील गोपीनाथ मंदिर आणि बुडबुड तळीला त्यांनी भेट दिली. तेथील पांडवकालीन तळीची माहिती घेतली.

Sreedharan Pillai
निवडणूक निकालांची भाकिते करण्यासाठी अहमहमिका

राज्यपालांनी (Governor) उगे, भाटी, वाडे कुर्डी ग्रामपंचायत मंडळांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या पत्नी के. रिटा, सचिव मिहीर वर्धन, सुरक्षा सचिव विश्राम बोरकर, लेफ्टनंट दर्शन नागराजन शंकर रेड्डी, संयुक्त जिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, सांगेचे उपजिल्हाधिकारी पांडुरंग ताळगावकर, मामलेदार राजेश साखळकर, गटविकास अधिकारी भगवंत करमली, उगेचे सरपंच उदय देसाई, भाटीचे सरपंच उदय नाईक, वाडे कुर्डीचे सरपंच डोमॅसियो बार्रेटो, पंचायत सचिव सुषमा सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी पंच माया जांगळे यांनी पंचायत क्षेत्रातील नेटवर्कचा अभाव आणि खास करून खाण व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा, अशी मागणी केली. भाटीचे सरपंच उदय नाईक यांनी नेत्रावळी अभयारण्यातील वन्य प्राण्यांमुळे मुख्य रस्त्यावर होणाऱ्या अपघातांवर उपाययोजना करण्याची मागणी केली. पंचायतीला मिळणारा कर थेट न मिळता तो सरकार (Government) विभागून देत असल्यामुळे विकासकामावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पिल्लई यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सरपंच उदय गावकर यांनी स्वागत केले तर सर्वानंद सावंत यांनी सूत्रसंचालन केले. संजय परवार यांनी आभार मानले.

Sreedharan Pillai
निवडणूक निकालांची भाकिते करण्यासाठी अहमहमिका

धरणग्रस्तांची अजूनही परवड

पंच मनोज पर्येकर म्हणाले, साळावली धरण बांधून 38 वर्षे पूर्ण झाली; पण समस्या सुटलेल्या नाहीत. दिलेले भूखंडही बुडाले, तर काहीजणांना अद्याप भूखंडच दिलेले नाहीत. ज्यांनी सरकारी जमीन हडप केली, ती काढून घेणे सरकारला शक्य नसल्यास नवीन जमीन खरेदी करून भूमिहीन शेतकऱ्यांना भूखंड देण्याची मागणी त्यांनी केली. या लोकांनी आरोग्य केंद्र तसेच शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची समस्या मांडली. वाडे कुर्डीचे सरपंच बार्रेटो आणि उपसरपंच कुष्ठा गावकर यांनी पाण्याची समस्या मांडली.

‘‘महात्मा गांधीजींच्या ‘ग्राम स्वराज’चे दर्शन घेण्याचा योग आला. गोवा (goa) आणि केरळ यातील केवळ भाषा वगळता नैसर्गिक वातावरण, खान-पान, संस्कृती एकसमान आहे. गोव्यातील राहणीमान आणि खेड्या-पाड्यातील संस्कृती पाहून मी भारावून गेलो. मी या यात्रेदरम्यान लोकांच्या समस्या जाणून घेणार असून त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला आदेश देणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com