साळगावात कमळ फुलणार; दिलीप परूळेकरांना विश्‍वास

लोबो यांना गोव्यातील जनतेचे काही पडलेले नाही; अशी टीका भाजपचे नेते दिलीप परूळेकर यांनी केली.
Dilip Parulekar
Dilip ParulekarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

साळगाव: राज्यात भाजपची सत्ता येणार हे निश्चित आहे. मायकल लोबोनी कार्यकर्त्यांना आणि मतदारांना कितीही आमिषे दाखवली तरी मतदार त्यांच्या आश्वासनांना बळी पडणार नाही. मायकल लोबो यांचे खरे रूप आता लोकांसमोर आले आहे. लोबो लोकांना फसवून स्वतःचा फायदा करण्यासाठी राजकारणामध्ये उच्चस्थान मिळवू पाहत आहेत. त्यांना साळगावातील जमिनी आणि शिवोलीतील डोंगर विकून त्यांना बिल्डर लॉबीसाठी काम करायचे आहे, टीका भाजपचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीप परूळेकर यांनी केली.

Dilip Parulekar
'उत्तर गोव्याचा विकास झाला तर दक्षिण गोवाही पुढे जाईल'

साळगाव मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार जयेश साळगावकर यांच्या पिळर्ण परिसरातील प्रचारात पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीप परुळेकरानी सहभाग घेतला. पक्षाने त्यांच्याकडे कळंगुट मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. तरीही वेळात वेळ काढून ते जयेश साळगावकर यांच्यासाठी घरोघरी प्रचारात सहभागी झाले. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पीडीए कॉलनीमध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

Dilip Parulekar
कुठ्ठाळीतील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवणार: अंतोनिया वास

परूळेकर म्हणाले, लोबो यांना गोव्यातील जनतेचे काही पडलेले नाही. पैसे वाटल्यानंतरही जनता त्यांच्या मदतीस येत नसल्याचे पाहून ते भयभीत झाले आहेत. यामुळे ते आता देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देऊ पाहत आहेत. पंतप्रधानांच्या नखाचीही सर नसलेल्या मायकल यांनी बोलण्यापूर्वी विचार करावा. साळगाव मतदारसंघ आता भाजपमय झाला आहे. जयेश साळगावकर आमदार म्हणून नक्की जिंकून येतील. भाजप गोव्यामध्ये पुन्हा स्थापन करेल. या परिसरात घरोघरी प्रचार मोहिमेस श्री. साळगावकर यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.