कुठ्ठाळीतील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवणार: अंतोनिया वास

कुठ्ठाळी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अंतोनिया वास यांनी गुरुवारी रोजी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित केला.
Vasco
VascoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Vasco: 2015 च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत माझ्या जाहीरनाम्यात जी कामे नमूद केली होती ती मी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. जिल्हा पंचायत पातळीवर राहून कुठ्ठाळीत 1 कोटी 64 लाख रुपयांची कामे केली आहे. 2022 विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) आणखीन विकासकामे करून सांकवाळ, झुवारीनगर, बिर्ला, कुठ्ठाळी, कासावली अग्रेसर नेणार असल्याचे वचन कुठ्ठाळीचे अपक्ष उमेदवार तथा जिल्हा पंचायत सदस्य आंतोनियो वास यांनी दिले.

कुठ्ठाळी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अंतोनिया वास यांनी गुरुवारी रोजी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी त्यांच्यासमवेत कासावली पंचायतीच्या पंच श्रीमती मार्था साल्ढाणा, वेलसावच्या उपसरपंच श्रीमती सिल्विया डीसील्वा, कुठ्ठाळीच्या माजी सरपंच श्रीमती सेनिया परेरा, माजी जिल्हा पंचायत सदस्य तथा पंच श्रीमती सिंथीया परेरा, कासावलीचे पंच जुझे मारी फुर्तादो, कुठ्ठाळीचे पंच सनी गामा, रोकोजीन डिसिल्वा व इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना अपक्ष उमेदवार वास म्हणाले की जिल्हा पंचायत सदस्य राहून मी अनेक विकास कामे पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो असून यात मला जनतेचे बऱ्यापैकी सहकार्य लाभले. कुठ्ठाळीतील जनतेला उद्भवणाऱ्या पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अंतोनिया वास यांनी दिली.

Vasco
एफसी गोवा प्रशिक्षकांना चमत्काराची अपेक्षा

तसेच कुठाळी मतदार संघात तीन कोमूनिदाद समित्या असून येथे राज्य पुनर्वसन महामंडळातर्फे घरे बांधून देण्यासाठी पुढाकार घेणार आहे. याचा सांकवाळ, वेळसाव, कुठ्ठाळीतील कोमुनिदाद जमिनी चांगल्या कार्यासाठी उपयोगात आणल्यास त्याचा फायदा जनतेला होईल अशी माहिती त्यांनी दिली. कुठ्ठाळी मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक पंचायत क्षेत्रात युवकांना विविध प्रकारच्या क्रीडा मैदान, इनडोअर मैदान उपलब्ध करून देणार असल्याची माहिती वास यांनी दिली. जनतेचा चांगल्या कार्यासाठी सदैव पुढाकार घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पंच मार्था साल्ढाणा यांनी कुठ्ठाळीच्या विकासासाठी आंतोनियो वास यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.