मुरगाव मतदारसंघात मिलिंद नाईक विरुद्ध आमोणकर यांच्यात रंगणार चुरशीची लढत

या मतदारसंघात भाजपकडून माजी मंत्री मिलिंद नाईक आणि काँग्रेसचे संकल्प आमोणकर हे दोघे तिसऱ्यांदा आमने-सामने आले आहेत.
Milind Naik And Sankalpa Amonkar
Milind Naik And Sankalpa AmonkarDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: विधानसभा निवडणुका अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील मतदार संघात पोलिस प्रशासन सतर्क आहे. इतर मतदारसंघांप्रमाणेच, मुरगावमध्ये देखील चुरशीची लढत दिसून येणार आहे. या मतदारसंघात भाजपकडून माजी मंत्री मिलिंद नाईक आणि काँग्रेसचे संकल्प आमोणकर हे दोघे तिसऱ्यांदा आमने-सामने आले आहेत. 2017 मध्ये आमोणकर हे नाईक यांचा पराभव करण्याच्या अगदी जवळ आले होते, दरम्यान त्यांचा अवघ्या 140 मतांनी पराभव झाला होता. (battle between Milind Naik and sankalp Amonkar In Murgaon constituency for goa election 2022)

Milind Naik And Sankalpa Amonkar
Goa Election 2022: आदित्य ठाकरे उद्या गोवा दौऱ्यावर

मिलिंद नाईक यांच्यासमोर मोठे आव्हान

2007 पासून मुरगावमधील काँग्रेस (Goa Congress) पक्षाची पकड तोडणारे आणि तेव्हापासून प्रतिस्पर्ध्याला एक हात लांब ठेवणारे नाईक यावेळी बॅकफूटवर आहेत. कारण सेक्स स्कँडल प्रकरणात अडकलेल्या मिलिंद नाईक यांना ही निवडणूक जास्त आव्हानात्मक ठरणार आहे. काँग्रेसने नाईक यांच्यावर एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. दरम्यान या प्रकरणाचा पुरावा काँग्रेसने पोलिस स्टेशनमध्ये सादर केला होता.

मुरगावमध्ये एकूण 20412 मतदार आहेत, जे राज्यातील सर्वात कमी मतदार असून, महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. या मतदारसंघात बंदरापासून मुख्य समस्या उद्भवतात. तसेच कोळशाच्या सततच्या प्रदूषणापासून ते अवजड वाहनांच्या वाहतुकीपर्यंत रहिवाशांना समस्या भेडसावत आहेत.

Milind Naik And Sankalpa Amonkar
गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गावर खड्डेच खड्डे

मुरगावमधील समस्या

"वास्को आणि मुरगावमध्ये (Mormugao), कोळशाच्या धुळीचे प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे आणि हा एक महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा आहे" असे वास्कोमधील पर्यावरणवादी सॅव्हियो कोरेया यांनी सांगितले. “बंदर प्राधिकरणाचे परिणाम, हे हानीकारक आहेत आणि याचा परिणाम मुरगाववर जास्त होत असतो. याशिवाय बंदरातील अनेक स्थानिक तरुण बेरोजगार आहेत याबद्दल मतदार मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

तसेच मतदारसंघातील (Constituency) बहुतांश भागात महागाई आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळे जनता नाराज आहे. महत्त्वाची बाब विचारात घ्यायची झाल्यास, जिथे लोकांची त्यांच्या आमदाराने त्यांच्या आवाहनाला उत्तर द्यावे अशी अपेक्षा होती, तिथे मिलिंद नाईक (Milind Naik) कोरोनाच्या काळात बेपत्ता होते. दरम्यान भाजप बॅकफूटवर असल्याची जाणीव होताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आमोणकर यांच्यासोबत घरोघरी जाऊन प्रचार करून फायदा उठवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र दोन्ही प्रतिस्पर्ध्यांचा मागील दशकभराचा सामना असून, प्रत्येक वेळी नाईकच विजयी झाले आहेत, परंतु यावेळी नाईक यांच्या या प्रकरणामुळे त्यांना ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com