पणजीत 'बाबूश'च लोकांचा फेव्हरेट

बाबूशचं तगडं आव्हान, उत्पल पर्रीकरांना मतदारांनी पाठ दाखवल्याचं चित्र
Babush Monserratte may win in Panjim
Babush Monserratte may win in PanjimDainik Gomantak

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेतील लढत म्हणजे उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांची पणजीतील लढत. मनोहर पर्रीकरांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर भाजपविरोधात बंड करत सामोरे आले आणि त्या बंडाची देशभरात एकच चर्चा सुरु झाली. उत्पल यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना पाठिंब्याचा ओघही सुरु झाला. मात्र निवडणुकीदिवशी मात्र चित्र काहीसं वेगळं दिसलं. (Babush Monserratte may win in Panjim News Updates)

Babush Monserratte may win in Panjim
साखळीत मुख्यमंत्री सावंतांना काँग्रेस डोईजड

पणजीत उत्पल पर्रीकरांनी भाजपच्या विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली खरी, मात्र आता बाबूश मोन्सेरात यांचं पारडं जड असल्याचं एकंदर चित्र दिसू लागलं आहे. उत्पल पर्रीकरांनी घरोघरी जात पणजीतील मतदारांना भावनिक साद घातली होती. आपणच मनोहर पर्रीकरांचा (Manohar Parrikar) खरा वारसदार असल्याचं लोकांना पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. मात्र जी सहानुभूती आणि पाठिंबा उत्पल यांना निवडणुकीपूर्वी किंवा प्रचारादरम्यान मिळत होता., तो निवडणुकीदिवशी काही दिसू शकला नाही.

Babush Monserratte may win in Panjim
Goa Election: फातोर्ड्यात हॅटट्रिक होणार की अडणार?

उत्पल पर्रीकरांनीही बाबूशसारखे ठिकठिकाणी बूथ उभे केले होते. मात्र भाजप (BJP) आणि बाबूशने सर्व ताकद पणाला लावल्याने बाबूशच्या बूथवर कार्यकर्ते सक्रीय होते. दुसरीकडे उत्पल यांच्या बूथवर मात्र दुपारनंतर शुकशुकाट पाहायला मिळाला. उत्पल यांचे कार्यकर्ते गायब झाल्याचं चित्र पणजीत ठिकठिकाणी पाहायला मिळालं. बाबूशवर उत्पल पर्रीकर यांनी गंभीर आरोप केले असले तरी बाबूश यांनी पणजीत विकासकामं केल्याने आणि चांगला जनसंपर्क असल्याने बाबूशच्या बूथवर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली.

Babush Monserratte may win in Panjim
उत्पल पर्रीकरांना केवळ वडिलांच्या वारशाचा आधार!

दुसरीकडे बाबूशच्या कार्यकर्त्यांनी मतदानादिवशी घरोघरी जात मतदारांना घराबाहेर काढत त्यांना मतदान करण्यासाठी बूथवर आणलं. उत्पल यांचे कार्यकर्तेच गायब असल्यामुळे निवडणुकीदिवशी उत्पल यांचं पारडं काहीसं झुकलेलं दिसून आलं. त्यातच सारस्वत लोकांनीही मोठ्या प्रमाणात बाबूशलाच मतदान केल्याची चर्चा आहे. जी मतं उत्पल यांना मिळण्याची आशा होती, ती बाबूशच्या पारड्यात पडल्याने उत्पलसमोरील अडचणींमध्ये वाढच झाली आहे. भाजपच्याही ज्या लोकांनी उत्पल यांना छुपा पाठिंबा दिला होता, त्यांनीही बाबूशची साथ दिल्याची माहिती आहे. त्यामुळे जो पाठिंबा निवडणुकीपूर्वी मिळाला, तो उत्पल यांना निवडणुकीदिवशी टिकवता आला नसल्याचं जाणकारांचं मत आहे.

उत्पल पर्रीकरांच्या (Utpal Parrikar ) बंडामुळे गोवा विधानसभा निवडणुकीत खरी रंगत आली. मात्र असं असलं तरी बाबूश मोन्सेरात यांचा जनसंपर्क आणि लोकांची केलेली कामं यामुळे मतदारांनी बाबूशला पाठिंबा दिल्याचं बोललं जातंय. बाबूश आणि उत्पल पर्रीकर यांचं राजकीय भवितव्य मतदारांनी मतपेटीत बंद केलं आहे. आता जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने मिळतोय हे येत्या 10 मार्चला स्पष्ट होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com