'बाबू' विरुद्ध 'बाबा'ची 'फ्री स्टाईल' लढत

मडगावात दिगंबर कामतांसमोर प्रथमच कडवे आव्हान
Babu Ajgaonkar and Digambar kamat political fight in Margao
Babu Ajgaonkar and Digambar kamat political fight in MargaoDainik Gomantak

मडगाव हा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा बालेकिल्ला. 1994 पासून दिगंबर कामत यांचे मडगाववर राज्य आहे. 1989 मध्ये त्यांना अपक्ष उमेदवार अनंत ऊर्फ बाबू नायक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. पण 1994 साली भाजपच्या उमेदवारीवर पहिल्यांदा विजय मिळविला. त्यानंतर ते विजयीच होत राहिले. 2005 साली काँग्रेस प्रवेश करुन सुद्धा त्यांच्या विजयात बाधा येऊ शकली नाही. दिगंबर कामत यांचा मडगावच्या मतदारांशी संपर्क वादातीत आहे. त्यामुळे त्यांना सातही वेळा निवडून येताना विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. यावेळी मात्र, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांच्या रुपाने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे.

बाबू हे मडगाववासीयच असल्याने ते मडगावच्या मतदारसघांबाबत चांगलेच वाकबदार आहेत. त्यात पुन्हा ते माजी नगरसेवक असल्यामुळे त्यांचा मडगावातील विविध प्रभागांशीही सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. ते मागच्यावेळी पेडण्यातून आले होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही मडगावात 'घर घर चलो अभियान' राबवल्यामुळे बाबू आजगावकरांची ताकद वाढल्यासारखी झाली आहे. आताही ही ताकद दिगंबर कामत यांचे आसन हलवण्यात उपयुक्त ठरते का, हे पाहावे लागेल. पण कामत यांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिगंबर कामत यांना मडगावात हरविणे म्हणजे `मुश्‍किल ही नही नामुकीन है`. (Political fight in Margao News Updates)

Babu Ajgaonkar and Digambar kamat political fight in Margao
‘आप’व्यतिरिक्त इतरांना दिलेले मत भाजपलाच: सिसोदिया

तृणमूलतर्फे (TMC) मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर हे रिंगणात उतरले असून ते किती मते घेतात, हे बघावे लागेल. ते जेवढी झेप घेतील, तेवढी ती दिगंबर कामत यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकेल. आपतर्फे लिंकन वाझ हे रिंगणात उतरले असले तरी त्यांचा विशेष प्रभाव जाणवत नाही. शेजारच्या फातोर्डा मतदारसंघात सक्रिय आप असलेले आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मडगावात मात्र शांत दिसत आहेत. पण त्यांचा प्रभावही काँग्रेसलाच हानिकारक ठरू शकतो.

आरजीतर्फे शशिराज शिरोडकर रिंगणात उतरले असून ते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रचार करताना दिसत आहेत. पण सध्या सगळा फोकस आहे तो बाबू विरुद्ध बाबा या लढतीवर. बाबू आजगावकर यांच्या म्हणण्यानुसार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी मडगावचा काहीच विकास केला नाही. तर दिगंबर कामत कोणताच दावा करताना दिसत नाहीत. म्हणूनच सामना जरा रोमहर्षक असला तरी अजूनही दिगंबर कामत यांचे पारडे जड वाटते. आता खरेच हे पारडे जड आहे, कि बाबू आजगावकर हे कामत यांना विधानसभेत आठव्यांदा जाण्यापासून रोखतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Babu Ajgaonkar and Digambar kamat political fight in Margao
Goa Assembly Election: बाबू केपेचा 'गड' राखणार का ?

'बळीचा बकरा'की ठरणार शेर !

मगोपच्या उमेदवारीवर बाबू आजगावकर यांनी भाजपच्या (BJP) राजेंद्र आर्लेकरांना चितपट केले होते. त्यानंतर भाजपमध्ये जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्रिपद पटकावले होते. असे असूनही त्यांना भाजपकडून पेडण्याची उमेदवारी नाकारण्यात आली. तडजोड म्हणून मग त्यांना मडगावची उमेदवारी देण्यात आली. दिगंबरापुढे लढणे म्हणजे हे एक आव्हानच असल्यामुळे भाजपला योग्य उमेदवारच सापडत नव्हता. तो त्यांना बाबूच्या रूपाने सापडला.`बळीचा बकरा` करण्याकरता भाजपने बाबू आजगावकरांना ही उमेदवारी दिली आहे, असे म्हटले जात होते. पण गेल्या काही दिवसांत बाबू आजगावकरांनी प्रचारात बराच नेट लावला असल्यामुळे निवडणुकीत रंगत येत चालली आहे. ते बळीचा बकरा ठरणार की, शेर हे निकालातूनच स्पष्ट होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com