Goa Election: 'गोव्यात काँग्रेसचेच सरकार सत्तेवर येणार'

गोव्यात सध्या काँग्रेसला अनुकूल वातावरण असून, यावेळी काँग्रेसचेच सरकार सत्तेवर येणार आहे. असा विश्वास महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी डिचोलीत बोलताना व्यक्त केला.
Ashok Chavan
Ashok Chavan Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: भाजपच्या कारभाराला गोमंतकीय जनता कंटाळली असून, यावेळी जनतेचा कल काँग्रेसच्या बाजूने आहे. गोव्यात सध्या काँग्रेसला अनुकूल वातावरण असून, यावेळी काँग्रेसचेच सरकार सत्तेवर येणार आहे. असा विश्वास महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी डिचोलीत (Bicholim) बोलताना व्यक्त केला. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डिचोलीत काँग्रेसचा (Congress) झेंडा फडकावण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे. असे आवाहनही त्यांनी केले. मंगळवारी सायंकाळी त्यांनी डिचोलीत धावती भेट दिली. काँग्रेसचे डिचोलीतील उमेदवार मेघ:श्याम राऊत यांच्या प्रचार कार्यालयाचेही त्यांनी उदघाटन केले. (Ashok Chavan Has Said That The Congress Government Will Come To Power In Goa)

भाजपवर टिका

खाण प्रश्न, बेरोजगारी आदी गोव्यातील प्रमुख प्रश्न सोडवण्यात भाजप सरकारला अपयश आले असून, या सरकारने गोव्याला आर्थिक संकटात टाकले आहे. 'कोविड'ची स्थितीही हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अशी टिकाही श्री. चव्हाण यांनी यावेळी बोलताना केली.

Ashok Chavan
Goa Election 2022: भाजपचा जाहीरनामा सादर करताना तानावडेंना आली पर्रीकरांची आठवण

दरम्यान, यावेळी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख तौफिक मुलानी, डिचोलीचे उमेदवार मेघ:श्याम राऊत, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे नझीर बेग, डिचोली गट काँग्रेसचे अध्यक्ष नितीन परब, महिला अध्यक्ष मारिया सौझा, सुबोध आमोणकर, नीता राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचार कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यकर्त्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com