हिंदूंना फसवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न: सरदेसाई

मुख्यमंत्री नेतृत्वाखालील भाजप सरकार पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीला सुरुवात करण्याची घोषणा करून हिंदूंना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले.
Vijai Sardesai

Vijai Sardesai

Dainik Gomantak

Published on
Updated on

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीला सुरुवात करण्याची घोषणा करून हिंदूंना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले. काल सांतआंद्रे मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे उमेदवार जगदीश भोबे यांच्या घरोघरी प्रचाराला सुरवात केल्यानंतर ते बोलत होते.

Vijai Sardesai

विजेच्या झटक्याने युवकाचा मृत्यू झाल्याची तक्रार

मुख्यमंत्री (CM Pramod Sawant) अशी विधाने करून लोकांचे लक्ष वळविण्याचे व मते मिळवण्याचे प्रयत्न करीत आहेत हे लोकांना पूर्णपणे कळून चुकले आहे. बंद असलेला खनिज व्यवसाय, महिलांची सुरक्षा, पर्यावरणाचा ऱ्हास आणि इतर विषयांवर भाजप सरकार उपाय घेण्यास अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे या विषयांकडे दुर्लक्ष करण्याकडे लोकांचे लक्ष वळविण्यात येत आहे. लोकांना स्वयंपाक गॅसवर मिळणारी सवलत या सरकारने बंद केली आहे. वारंवार पेट्रोल व डिझेल (Petrol and Diesel) तसेच स्वयंपाक गॅसवरील किंमती वाढत आहेत त्यामुळे महागाईला सामोरे जावे लागत आहे. ही महागाई कधी हे सरकार रोखणार? असा सवाल त्यांनी केला.

Vijai Sardesai

विजेच्या झटक्याने युवकाचा मृत्यू झाल्याची तक्रार

यावेळी आमदार सरदेसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांतआंद्रे मतदारसंघातील मार्केटमध्ये जगदिश भोबे या उमेदवाराचा प्रचार करत व्यावसायिकांना त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजपचा (BJP) पराभव करून त्यांच्या उमेदवारांना घरी पाठवणे हे काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्डच्या (Goa Forward Party) युतीमागील मुख्य उद्देश आहेज असे सांगून गोवा फॉरवर्डचे संभाव्य उमेदवार जगदिश भोबे म्हणाले की, सांत आंद्रेतील लोकांना यावेळी बदल हवा आहे व तो या युतीला देतील. सांतआंद्रे मध्ये कोणताही विकास झालेला नाही. अनेक न सुटलेले मुद्दे आहेत. त्यामुळे स्थानिक संतप्त आहेत.

Vijai Sardesai

गिरी येथे 13,62 लाखांचे अमली पदार्थ जप्त

पक्षांतर करणाऱ्यांना धडा शिकवा...

‘कोविड’ काळात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या चुकीच्या कारभारामुळे इतर धर्मीयांचे नव्हे, तर कोविडबाधित हिंदूंचाही मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील जनतेला सांगावे की ते खाणकाम पुन्हा सुरू करण्यात का अपयशी ठरले, गोव्यात कोळसा का आणला आणि महिलांना सुरक्षितता देण्यात ते का अपयशी ठरले. जनतेच्या इच्छेविरुद्ध जाऊन लोकशाहीची हत्या करणाऱ्या पक्षांतर करणाऱ्यांना लोक धडा शिकवतील. या पक्षांतर करणाऱ्यांनी गोव्याच्या कल्याणासाठी नव्हे तर स्वविकासासाठी पक्ष बदलला, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com