पी. चिदंबरम : भाजपला पराभूत करण्याची क्षमता काँग्रेसमध्येच

फुटलेल्या आमदारांविषयी भाष्य टाळले...
 P.Chidambaram

P.Chidambaram

Dainik Gomantak

पणजी: तृणमूल काँग्रेस आणि ‘आप’ हे गोव्यात भाजपच्या मतांचे विभाजन करत आहेत. काँग्रेसचे आमदार तृणमूलमध्ये गेल्याने कोणताही परिणाम होणार नाही. उलट त्यांनी आगामी निवडणुकीत आलेक्स रेजिनाल्ड या पराभूत उमेदवाराला काढून घेतले. त्यांना निवडणुकीत उतरवले असते, तर ते पराभूत झाले असते. भाजपला पराभूत करण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे, असा शड्डू कॉंग्रेसचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम (P.Chidambaram) यांनी काल दिल्लीमध्ये ठोकला.

<div class="paragraphs"><p> P.Chidambaram  </p></div>
विजेच्या झटक्याने युवकाचा मृत्यू झाल्याची तक्रार

आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) उमेदवार निवडताना त्याची पक्षाशी व मतदारांशी असलेली निष्ठा हा निकष लावला जाणार आहे. निवडून आलेले उमेदवार हे पक्षाशी व मतदारांशी एकनिष्ठ राहतील, असा विश्‍वास व्यक्त करून चिदंबरम (P. Chidambaram) म्हणाले की, काँग्रेसच्या (Congress) गट मंडळाने जी नावे पाठविली, त्यातूनच उमेदवारी दिली जाणार आहे. काँग्रेसला दणका देत तृणमूल काँग्रेसमध्ये आलेक्स रेजिनाल्ड (Alex Reginald) हे गेल्यावर चिदंबरम यांनी हे वक्तव्य केले आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या दोन आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये तर एकाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

<div class="paragraphs"><p> P.Chidambaram  </p></div>
गिरी येथे 13,62 लाखांचे अमली पदार्थ जप्त

काँग्रेस हा गोव्यातील सर्व 40 मतदारसंघांमध्ये खोलपर्यंत मुळे रुतलेला पक्ष आहे. त्यामुळे लोकांना माहीत आहे की भाजपला सत्तेपासून दूर हटवण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गोवा फॉरवर्डशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. संधी, जोखीम व अडथळे आहेत. मात्र, अंतिम निर्णय केंद्रीय समितीच घेईल, असेही चिदंबरम यांनी सांगितले.

मध्ये भाजप व काँग्रेस यांच्यातील थेट लढतीत काँग्रेसच बाजी मारणार आहे. काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांच्याशी सल्लामसलत करून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा की नाही, याबाबत पर्याय खुला ठेवला जाईल, असे चिदंबरम म्हणाले.

काँग्रेसमधून गेलेल्या आमदारांबाबत (MLA) भाष्य करणे चिदंबरम यांनी टाळले. काँग्रेसचे 99 टक्के कार्यकर्ते अजून काँग्रेसमध्येच आहेत. काँग्रेस कार्यकर्ते व कुडतरी मतदारसंघातील मतदारांनी आलेक्स लॉरेन्स यांचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवर जिंकून येणाऱ्या रेजिनाल्ड यांनी लोकांचा विश्‍वास गमावला आहे. आगामी निवडणूक त्यांना महाग पडणार, हे निश्‍चित आहे, असेही चिदंबरम म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com