Goa Election: 'काँग्रेसला मतदान करणं म्हणजे भाजपला पाठिंबा देणं'

काँग्रेसने (Congress) नेहमीच भाजपला सरकार बनवण्यासाठी मदत केली आहे", असाही आरोप त्यांनी केला.
Alina Saldanha
Alina SaldanhaDainik Gomantak
Published on
Updated on

आम आदमी पक्षाच्या उमेदवार अलिना साल्ढाणा (Alina Saldanha) यांनी मंगळवारी गोवेकरांना काँग्रेसवर आपली बहुमोल मते वाया घालवू नका, असे आवाहन केले आहे. काँग्रेसला मतदान करणे म्हणजे भाजपला (BJP) पाठिंबा देणे असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसचे (Congress) उमेदवार आगोदर निवडूण येतात, आणि नंतर भाजपला विकले जातात असही त्यावेळी म्हणाल्या "आम्ही हे बर्‍याच राज्यांमध्ये पाहिले आहे. काँग्रेसने नेहमीच भाजपला सरकार बनवण्यासाठी मदत केली आहे", असाही आरोप त्यांनी केला. (Alina Saldhana Has Said That Voting For Congress Means Supporting BJP)

"काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाला मत म्हणजे भाजपला मत. काँग्रेसने निवडणुकीत 10-12 जागाही जिंकल्या तर त्या भाजपला विकल्या जातील. त्यामुळे मत वाया घालवू नका. अस त्या म्हणाल्या.

Alina Saldanha
Goa Election 2022: भाजपचा जाहीरनामा सादर करताना तानावडेंना आली पर्रीकरांची आठवण

"आपला मतदान करणे म्हणजे 5 वर्षांच्या कालावधीत प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपयांचा आर्थिक लाभ. आप ला मतदान करणे म्हणजे गोव्याच्या विकासासाठी मतदान करणे ज्यामध्ये शाळा, रुग्णालये, महिला सक्षमीकरण आणि भरभराटीचे व्यवसाय समाविष्ट आहेत. आपला विजयाची खात्री आहे. हा एकमेव पक्ष आहे जो गोव्याचा विकास करू शकतो."अस त्या म्हणाल्या.

"आज, दिल्लीत जे काही केले जात आहे ते सर्व सामान्य लोकांच्या फायद्याचे आहे. सामान्य नागरिकांच्या उत्थानाची खात्री करणे हे प्रत्येक सरकारचे ध्येय असले पाहिजे. प्रत्येक वॉर्डातील आपचे शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि मोहल्ला दवाखाने सामान्य लोकांची सेवा करतात. त्याचप्रमाणे , आप सत्तेवर निवडून आल्यास ते पायाभूत सुविधांच्या विकासासोबत मानवी विकासावर लक्ष केंद्रित करेल," अस त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com