Goa : रेईश-मागुश येथील सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker) प्रगती पेडणेकर यांनी बुधवारी आपच्या ताळगाव विधानसभा प्रभारी सेसिल रॉड्रिग्स आणि आप कळंगुटचे नेते सुदेश मयेकर यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला.
अरविंद केजरीवाल यांच्या गोव्यासाठीच्या विकासात्मक दृष्टी कोणाने प्रभावित झाले. आपचे कोरोना काळातील कार्य, विकासाचे व्हीजन यासारख्या अनेक गोष्टीमुळे आपमध्ये (AAP) प्रवेश करत असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.
सेसिल रॉड्रिग्स म्हणाल्या, की पेडणेकर यांनी 2020 साली रेईश मागुशमधून जिल्हा पंचायत निवडणूक लढवली. 2012 पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. आज त्या आपल्या समर्थकांसह आपमध्ये झाल्याचा आनंद आहे. गोव्याच्या काळजीसाठी निवडणुकीपूर्वी आप हा पक्ष सक्रियपणे मैदानात उतरला आहे.
आतापर्यंत केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी राज्याला पाच हमीभावांचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गोव्याचे नशीब बदलेल. गेल्या निवडणुकीत गोवेकरांनी काँग्रेसवर विश्वास ठेवून त्यांना मतदान केले. मात्र, काँग्रेसच्या आमदारांनी गोवेकरांचा विश्वासघात करून भाजपात प्रवेश केला. आप हा एकमेव पक्ष आहे जो गोव्याचा कायापालट करेल, असे मत प्रगती पेडणेकर यांनी व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.