Ghumat Aarti Competition : घुमट आरती स्पर्धेत नेरूलचे साखळेश्‍वर आरती मंडळ प्रथम

स्थानिक भजनी कलाकार कृष्णनाथ कुंडईकर, पंच जयंती नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
Sakhleswar Aarti Mandal first
Sakhleswar Aarti Mandal firstdainik gomantak
Published on
Updated on

Ghumat Aarti Competition : तिसवाडी, चोडण येथील माडेल युवातर्फे आयोजित अखिल घुमट आरती स्पर्धेत नेरूल बार्देश येथील श्री साखळेश्‍वर आरती मंडळाने प्रथम बक्षीस पटकावले.ही स्पर्धा माडेल-चोडण येथील श्री देवकीकृष्ण सभामंडपात आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेचे दुसरे श्री शिवभूमिका आरती मंडळ, साळ, तिसरे वैरागी नवदुर्गा आरती मंडळ, मडकई तर चौथे सातेरी आरती मंडळ, म्हापसा यांनी पटकावले. पाचवे - हेंरब आरती मंडळ, धारगळ-पेडणे तर श्री लईराई आरती मंडळ- शिरगाव यांनी सहावे बक्षीस प्राप्त केले.

पांडुरंग गावंकर यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले. स्थानिक भजनी कलाकार कृष्णनाथ कुंडईकर, पंच जयंती नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

बक्षीस वितरणास प्रमुख पाहुणे म्हणून चोडण माडेल सरपंच रवींद्र किनळकर, पंच जयंती नाईक, समजाकार्यर्ते-पांडुरंग गांवकर, पत्रकार- महेश आमोणकर व स्पर्धेचे परीक्षक- विजेश नाईक (पर्वरी) व गौरेश मयेकर (चोडण) उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण नामवंत १० स्पर्धकांनी भाग घेतला होता.

वैयक्तिक बक्षीस विजेते असे

उत्कृष्ट गायक- यशवंत कोठंबीकर, श्री साई समर्थ गोगलेश्वर, आ.मं. मडगाव, उत्कृष्ट समेळवादक- प्रनिक सावंत- श्री सातेरी घुमट आ.मंडळ- म्हापसा, उत्कृष्ट कासाळेवादक- जयेश मडकईकर -श्री सिध्देश्वर नवदुर्गा आ.मं. कुंडई, उत्कृष्ट गजर- हेरंब आरती मंडळ, धारगळ यांना देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com