Damodar Temple Fatorda: लोकांच्या हाकेला पावणारा देव! श्री दामोदर देवस्थान (लिंग), फातोर्डा वार्षिकोत्सव

Mhadd Fatorda Damodar Temple: दामोदर नगर (म्हाड्ड), फातोर्डा येथील श्री दामोदर देवस्थानचा वार्षिकोत्सव १८ ते २१ जानेवारी असे चार दिवस भरगच्च कार्यक्रमांनी साजरा होत आहे.
Mhadd Fatorda Damodar Temple
Damodar Temple FatordaDainik Gomantak
Published on
Updated on

दामोदर नगर (म्हाड्ड), फातोर्डा येथील श्री दामोदर देवस्थानचा वार्षिकोत्सव १८ ते २१ जानेवारी असे चार दिवस भरगच्च कार्यक्रमांनी साजरा होत आहे. मडगावकरांचे आराध्य दैवत त्याचप्रमाणे सासष्टी तालुक्यातील लोकांच्या हाकेला पावणारा देव म्हणजेच श्री दामोदर. या देवाचे आद्यस्थान म्हणजेच म्हाड्ड, फातोर्डा येथील सुसज्ज अशा श्री दामोदर देवस्थानात स्थापन केलेले श्री दामोदर लिंग. हे एक जागृत देवस्थान अशी सर्व भक्त व भाविकांची भावना आहे.

श्री दामोदर मंदिरातील लिंग हे एक स्वयंभू लिंग असून पोर्तुगीज काळात या देवाचे स्थलांतर सांगे तालुक्यातील कुशावती नदीच्या काठी वसलेल्या जांबावली या गावी झाले. असे असले तरी या म्हाड्ड-फातोर्डा येथील मूळस्थानी अजूनही दैवी साक्षात्कार आहे. या ठिकाणचे लिंग अजूनही वाढतच आहे, असे येथील जाणकार चंद्रकांत कामत यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते.

श्री. कामत असेही सांगतात की, या जागी सुमारे २० ते २२ पाण्याच्या विहिरी व अनेक शिळा सापडल्या होत्या.

येथील विहिरीचे पाणी मडगावातील लोक वापरण्यासाठी नेत असत. त्यातील एक विहीर अजूनही फातोर्डा स्टेडियममध्ये असून या विहिरीचे पाणी अजूनही वापरण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली.

हा संपूर्ण परिसर म्हणजे एक ख्रिस्ती भाटकाराची जागा होय. या परिसरात सर्वत्र शेती होती. या जागी मशागत करून कितीही शेती पिकवली तर ती चांगल्या तऱ्हेने व्हायची; पण भात तयार व्हायचे ते मात्र पोकळ असायचे असे ते सांगतात.

अध्यक्ष या नात्याने अमरेश नाईक हे देवस्थानचे काम पहात असून श्री. नाईक यांच्याबरोबरच इतर सभासदही देवस्थानाच्या कामात हातभार लावतात.

या ठिकाणी पूर्वीपासून दर पौष कृ. अमावास्येला सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येत असते. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या फातोर्डा येथील स्वयंभू शिवलिंगाच्या श्री दामोदराचे मूळस्थानी खऱ्या अर्थाने १९५४च्या दरम्यान पूजनोत्सवाला सुरुवात झाली.

शिव-लिंगाच्या प्राचीनतेची साक्ष देणारी कोरीव तळी (जलकुंभ) आजही देवस्थान समोर आहे. सन १९५७ साली २१ श्री सत्यनारायण पूजा २१ दाम्पत्यांसह एकाचवेळी बांधून वार्षिकोत्सवाला सुरुवात करण्यात आली ती आजतागायत ही परंपरा अखंडितपणे चालू आहे.

एकेकाळी या वार्षिकोत्सवात १५ नाटके होत असत. दर सोमवारी दामबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून रात्रीपर्यंत अलोट गर्दी असते. दर सोमवारी रात्री भजनाचा कार्यक्रम असतो. दरवर्षी श्रावण सोमवारीही येथे पहाटे चार वाजल्यापासून महाअभिषेक चालू असतो.

शेवटच्या श्रावण रविवारी २४ तासांचा अखंड भजनी सप्ताह चालू होऊन त्याची सांगता सोमवारी करण्यात येते. त्या दिवशी दिवसभर भाविकांकडून अभिषेक, पूजा होऊन सायंकाळी कमिटीमार्फत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून भाविकांकडून महाअभिषेक करण्यास सुरुवात होते. यावेळी भक्तांची मोठी रांग लागलेली असते. भाविक लोक सायंकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी अभिषेक करण्यासाठी बसलेले असतात.

Mhadd Fatorda Damodar Temple
Bodgeshwar Jatra: "पूर्वी म्हापशात जत्रेचा फलक पाठीवर घेऊन, ढोल-ताशा वाजवत दवंडी पिटली जायची"; बोडगेश्वर जत्रेचा इतिहास

यंदा वार्षिकोत्सवा निमित्त आयोजित केलेले कार्यक्रम पुढीलप्रमाणे ः-

रविवार १८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सार्वजनिक लघुरुद्र, सायंकाळी ३.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, तदनंतर पुराण, आरत्या, तीर्थप्रसाद व रात्रो ९ वाजता महाप्रसाद

सोमवार १९ जानेवारी - सायंकाळी ७ वाजता श्रींच्या फळांची पावणी, त्यानंतर तुळशीदास धोणशीकर लिखित, उमेश कृष्ण बांदोडकर सूत्रधार व दीपराज दुर्गादास मडकईकर दिग्दर्शित कोकणी नाटक ‘जांवय शेणलो मावोड्या’.

Mhadd Fatorda Damodar Temple
Damodar Temple: श्री दामोदर मुरगावला कसे आले? सप्ताह कसा सुरु झाला? 126 वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडणार ‘मुरगावचा दामबाब’ मधून

मंगळवार २० जानेवारी - सायंकाळी ७ वाजता पावणी नंतर रंगधारा मडगाव प्रस्तुत मराठी नाटक ‘छू मंतर’.

बुधवार २१ जानेवारी - सायंकाळी ४ वाजता फातोर्डा गवळी समाजातर्फे श्री सत्यनारायण पूजा. सायंकाळी ७ वाजता पावणी व नंतर नाट्य, भक्ती व भाव गीतांचा कार्यक्रम स्वर - दामोदर. गायक - अमृता पेडणेकर, अक्षय नाईक, समृद्ध चो़डणकर, संगीत संयोजन - धनराज मडकईकर, निवेदिका - सिद्धी उपाध्ये.

- परिचित

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com