Rapan Fishing: चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओढली रापण! होडी खेचून आणली किनाऱ्यावर; शाळेचा अभिनव उपक्रम

Goa Fishing: मडगाव येथील महिला नूतन हायस्कूलच्या विद्याभारती या प्राथमिक विभागाचे विद्यार्थी हल्ली वर्गाच्या चार भिंती बाहेरील अनुभव आनंदाने घेताना दिसत आहेत.
Rapan Fishing
Goa FishingDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव येथील महिला नूतन हायस्कूलच्या विद्याभारती या प्राथमिक विभागाचे विद्यार्थी हल्ली वर्गाच्या चार भिंती बाहेरील अनुभव आनंदाने घेताना दिसत आहेत. शेताला दिलेली भेट, पातोळी महोत्सव साजरीकरण अशा उपक्रमानंतर शनिवारी त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर रापण कशी ओढतात याचा अनुभव घेतला.

बाणावली येथील सुप्रसिद्ध मच्छीमार पेले याने या विद्यार्थ्यांना तर आपण या पारंपारिक मच्छीमार तंत्राची ओळख करून दिली आणि त्यांच्याकडून प्रात्यक्षिकही करून घेतले. विशेष म्हणजे पेलेने यावेळी पारंपारिक‌ मच्छीमाराची वेशभूषा (काष्टी)‌ केली होती. 

महिला नूतन हायस्कूलच्या शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष विनय पाटकर यांनी या उपक्रमासाठी विशेष भर घेतला होता. या उपक्रमाविषयी सांगताना ते म्हणाले, 'मुलांना गोव्याच्या पारंपारिक व्यवसायाबद्दल अनेकदा प्रत्यक्ष अशी माहिती नसते. त्यांना अशा व्यवसायांबद्दल एखादा निबंध लिहायला सांगितल्यास ते त्यासंबंधी कसे लिहितील हा एक मोठाच प्रश्न आहे. मुलांना आपल्या गोव्यातील अशा परंपरांची ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम शाळेमार्फत आयोजित केला होता.'

Rapan Fishing
Rapan Fishing: रापण ओढा रे! शेकडो वर्षांपासून उधाणलेला समुद्र, ढगाळ आकाशाखाली होणारी पारंपरिक मासेमारी पद्धत

विद्या भारतीच्या चौथीच्या वर्गातील एकूण 120 मुलांनी पेले आणि त्याच्या टीमकडून रापण जाणून घेतली. समुद्रातील होडी खेचून किनाऱ्यावर आणण्यात त्यांनी आपला हातभारही लावला.‌

Rapan Fishing
Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

जाळीत मासे कसे अडकतात हे त्यांनी पेलेकडून समजून घेतले तसेच  माशांच्या वेगवेगळ्या प्रजातींची नावेही त्यांना यानिमित्ताने कळली. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून साधारण तीन तास मुलांनी किनाऱ्यावर रापणीची मौज घेत होते.‌ 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com