Shantadurga Temple: '..झळाळती कोटी ज्योती या'! डिचोली शांतादुर्गा मंदिरात 2000 पणत्या प्रज्वलित, दीपोत्सव उत्साहात Video

Shantadurga Temple Bicholim Diwali: गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात ‘दीपोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीपोत्सवात बालगोपाळांसह महिला भाविक सहभागी झाले होते.
Shantadurga Temple, Bicholim
Shantadurga Temple, BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात ‘दीपोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीपोत्सवात बालगोपाळांसह महिला भाविक सहभागी झाले होते.

भाविकांनी मिळून जवळपास दोन हजार पणत्या प्रज्वलित करुन दीपोत्सवाचा आनंद लुटला. श्री शांतादुर्गा देवस्थान ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे शुक्रवारी रात्री या दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या दीपोत्सवात ज्येष्ठ महिलाही सहभागी झाल्या होत्या.

Shantadurga Temple, Bicholim
Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

रात्री भाविक मंदिरात जमताच, दीपोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. पणत्या प्रज्वलित करताच, मंदिरात दिव्यांचा लखलखाट आणि झगमगाट पसरला. दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर परिसर उजळून गेला होता. रांगोळी आणि पणत्यांतून ‘श्री शांतादुर्गा देवी प्रसन्न’ अशी आरास करण्यात आली होती. ही आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

Shantadurga Temple, Bicholim
Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

दीपोत्सव साजरा झाल्यानंतर श्री शांतादुर्गा देवीसमोर आरती झाली. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ, गावकर मंडळी उपस्थित होती. गेल्या पाच वर्षांपासून दीपोत्सव साजरा करण्यात येत असून, या दीपोत्सवातून दिवाळीच्या उत्साहात भर पडत आहे, असे देवस्थानचे अध्यक्ष राकेश गावकर आणि सचिव श्यामू गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com