Shantadurga Fatarpekarin Jatrotstav: शांतादुर्गा फातर्पेकरिणीची रविवारी जत्रा, 24 रोजीपर्यंत विविध कार्यक्रम; 25 रोजी पहाटे श्रींचा ‘महारथ’

Shantadurga Fatarpekarin Jatrotstav 2025: फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्‍थानची वार्षिक जत्रा रविवार, २१ डिसेंबरपासून सुरू होणार.

मडगाव: फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्‍थानची वार्षिक जत्रा रविवार, २१ डिसेंबरपासून सुरू होणार असून २५ डिसेंबर रोजी पहाटे ६ वा. होणाऱ्या महारथ मिरवणुकीनंतर या जत्रेची सांगता होणार आहे.

यानंतर तीन दिवस देवीला अर्पण केलेले दागिने आणि कपड्यांचा लिलाव होणार आहे. गोव्‍यातील प्रसिद्ध असलेल्‍या या देवस्‍थानाच्‍या जत्रोत्‍सवाला गोव्‍याबराेबरच शेजारील कर्नाटक आणि महाराष्‍ट्रातील भाविक उपस्‍थित राहणार आहेत.

बुधवारी देवस्‍थानतर्फे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत देवस्‍थानचे अध्‍यक्ष देवेंद्र देसाई यांनी या उत्‍सवाची माहिती दिली. यावेळी त्‍यांच्‍याबरोबर देवस्‍थान समितीचे सचिव अजय देसाई, खजिनदार सत्येंद्र देसाई, मुखत्यार संजय देसाई हे उपस्‍थित होते. या जत्रोत्‍सवादरम्‍यान भाविकांच्‍या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययाेजना केल्‍याचेही सांगण्‍यात आले.

पौष शुद्ध प्रतिपदा म्‍हणजे रविवार, २१ डिसेंबरपासून हा उत्‍सव सुरू हाेणार असून पहिल्‍या दिवशी सकाळी श्रींस महाअभिषेक होणार आहे. रात्री विधिपूर्वक नमन झाल्‍यानंतर १० वा. शिबिकोत्‍सव आणि नंतर दिंडीच्‍या गजरात देवीची चांदीच्‍या रथातून मिरवणूक होणार आहे. त्‍यानंतर ‘पांडगो इलो रे बा इलो’ या विनाेदी मालवणी नाटकाचा प्रयोग होणार आहे.

सोमवार, २२ रोजी सकाळी महाअभिषेक, रात्री शिबिकोत्‍सव आणि त्‍यानंतर देवीची मयूर रथातून मिरवणूक होणार आहे. नंतर ‘आरे देवा, तू रे भावा!’ हे विनोदी कोकणी नाटक सादर होणार आहे. मंगळवार, २३ रोजी सकाळी महाअभिषेक, रात्री १० वा. शिबिकोत्‍सव त्‍यानंतर श्रीची सूर्यरथातून मिरवणूक त्‍यानंतर ‘यो घर तुमचेच’ हे कोकणी नाटक होणार आहे. बुधवार, २४ रोजी सकाळी महाअभिषेक, रात्री ११ वा. स्‍टार मेलोडिज हा ऑर्केस्‍ट्रा त्‍यानंतर गुरुवार, २५ रोजी पहाटे ६ वा. देवीची महारथातून मिरवणूक होणार आहे. त्‍यानंतर आरती व प्रसाद झाल्‍यानंतर या उत्‍सवाची सांगता होणार आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com