Kamdhenu Cow: चेहरा देवीचा, शरीर पशूचे; समुद्रमंथनातून अवतरलेल्या 'कामधेनू गायीचा' वसुबारसशी काय संबंध? वाचा कथा आणि महत्व

Diwali Vasubaras 2025: गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस या दिवसापासून दीपावलीची सुरुवात होते. प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि दक्षिणेचा काही भाग इथे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो.
Kamdhenu Cow, Diwali Vasubaras 2025
Kamdhenu Cow, Diwali Vasubaras 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

या लेखात काय वाचाल?

१. वसुबारस का साजरे केले जाते?

२. समुद्रमंथन आणि वसुबारस यांचा संबंध

३. कामधेनू गायीची संपूर्ण माहिती

मी अविवेकाची काजळी, फेडूनि विवेकदीप उजळी।

ते योगिया पाहे दिवाळी, निरंतर।।

दिवाळी आता जवळच येऊन ठेपली आहे. बाजारात सर्वत्र धूमधाम सुरू आहे. गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस या दिवसापासून दीपावलीची सुरुवात होते. प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि दक्षिणेचा काही भाग इथे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या दिवशी गाईची मनोभावे पूजा केली जाते. तिला छान सजवले जाते. तिला देवीस्वरूप मानून नैवैद्य दाखवला जातो.

या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्णाची आराधना केली जाते. आपला देश शेतीप्रधान असल्यामुळे वसुबारस या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठीमध्ये आपण याला वसुबारस किंवा गोवत द्वादशी म्हणतो पण गुजरात मध्ये याला बाग बारस आणि दक्षिण भारतात नंदिनी व्रत असे संबोधतात.

वसुबारस कथा

वसुबारसाची कथा कामधेनू गायीवर आधारित आहे. ही दंतकथा अशी सांगितली जाते की समुद्रमंथन जेव्हा सुरू होतं तेव्हा यातून १४ रत्ने मिळाली. कामधेनू गाय त्यापैकी एक. ही गाय दैवी शक्तींनी परिपूर्ण होती. ती गाय जिथे असेल तिथल्या लोकांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती तिच्यात होती असे सांगितले जाते. अशा या पवित्र गाईचे स्मरण म्हणून वसुबारस हा दिवस साजरा केला जातो.

कशी दिसायची कामधेनू गाय?

कामधेनू गाय समुद्रमंथनातून मिळाली होती याबद्दल आपण माहिती घेतली. पुराणातील वर्णनानुसार कामधेनूचे शरीर गाईसारखे होते आणि चेहरा एखाद्या देवीसारखा होता. तिचा वर्ण पांढराशुभ्र होता. तीचे रूप तेजस्वी होते. तीच्या मस्तकावरती रत्नजडित मुकुट होता आणि शरीरावर सुवर्णालंकार. तिचे वसती स्थान स्वर्ग होते असे मानले जाते.

Kamdhenu Cow, Diwali Vasubaras 2025
Goa Diwali 2024: तुम्हाला माहितीये का? गोव्यात होतं असं एक बेट जिथे 12 महिने साजरी व्हायची दिवाळी

महत्व

आपला देश हा कृषीप्रधान आहे. गाय हे वैभवाचे प्रतीक मानले जाते. आजही घरच्या गोठ्यात दुभती गाय असणे वैभव मानले जाते. भारतीय संस्कृतीत गोधन हा शब्द आपण वापरतो. म्हणूनच या गो- धनाचे पूजन करण्यासाठी, तिच्या उपकारांची जाण ठेवण्यासाठी, माणसाचे जमिनीचे नाते ध्यानात घेऊन आपण हा सण साजरा करतो. विशेषतः ग्रामीण भागात याचे महत्त्व अजूनही आहे.

Kamdhenu Cow, Diwali Vasubaras 2025
Narkasur in Goa: संपूर्ण भारतापेक्षा गोव्याची दिवाळी असते खास! राक्षस वधाने होते पहाट, कुठे पाहाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

FAQs

Q1. २०२५ साली वसुबारस किती तारखेला आहे?

२०२५ साली वसुबारस १७ ऑक्टोबर रोजी आहे.

Q2. वसुबारस मागची कथा काय आहे?

वसुबारस साजरा करण्यामागे समुद्रमंथन आणि कामधेनू गायीची कथा आहे.

Q3. कामधेनू गाय कुठे होती?

कामधेनू गाय स्वर्गात होती, समुद्रमंथनांनंतर ती पृथ्वीवर प्रकट झाली.

Q4. कामधेनू गाय कशी दिसायची?

कामधेनू शुभ्र होती. तिचा चेहरा स्त्रीचा होता आणि शरीर गायीसारखे होते.

Q5. महाराष्ट्र सोडून इतर कुठे वसुबारस साजरा होतो?

वसुबारस महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात तसेच दक्षिण भारतात काही ठिकाणी साजरा होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com