Goa Diwali 2024: तुम्हाला माहितीये का? गोव्यात होतं असं एक बेट जिथे 12 महिने साजरी व्हायची दिवाळी

Divar Island Goa Diwali: पूर्वीच्या काळात या ठिकाणी अनेक मंदिरं स्थापित केली गेली होती आणि या मंदिरांमध्ये नेहमीच अनेक दिव्यांची रोषणाई असायची किंवा उत्सव साजरे केले जायचे, परिणामी ही जागा उजळून निघायची आणि म्हणूनच या जागेला दीपवती बेट असं नाव पडलं
Goa Diwali Festival: पूर्वीच्या काळात या ठिकाणी अनेक मंदिरं स्थापित केली गेली होती आणि या मंदिरांमध्ये नेहमीच अनेक दिव्यांची रोषणाई असायची  किंवा उत्सव साजरे केले जायचे, परिणामी ही जागा उजळून निघायची आणि म्हणूनच या जागेला दीपवती बेट असं नाव पडलं
Diwali 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Divar Island Goa, History and Significance

दिवाळी, दिव्यांचा आणि आनंदाचा सण. सगळी दुःख, चिंता बाजूला सारत आपल्या माणसांसह एकत्र येण्याचा सण. दिव्याचा प्रकाश जसा अजुनबाजूचा अंधकार नष्ट करतो अगदी तसंच ज्ञानाने अज्ञान दूर करण्याचा, सुखाने दुःखावर मात करण्याचा सण म्हणजेच दिवाळी. हा दिवाळीचा सण पोर्तूगीज काळात कसा साजरा व्हायचा?

पोर्तुगीज गोव्यात येण्यापूर्वी हे राज्य सधन, आनंदी आणि समाधानी होतं. आपल्याजवळ जे काही आहे ती सगळी ईश्वरची देन असं म्हणत ईश्वर भक्तीत रमणारं. गोव्यातली लोकं श्रद्धाळू, ईश्वरासमोर नतमस्तक होणारी, कृतज्ञतेचा भाव असणारी. पोर्तुगीज येण्याआधी गोव्यात बऱ्याच मोठा प्रमाणात शेतीचा व्यवसाय केला जायचा. शेतीवर लोकांचं घर चालायचं, हातात पैसा खेळायचा.

शेतीसाठी सर्वात महत्वाची असते ती सुपीक जमीन. गोव्यात देखील असंच एक बेट होतं (Divar Island History) , जिथली जमीन शेतीसाठी अगदी साजेशी होती. असं म्हणतात या बेटावर वर्षभर दिवाळी साजरी केली जायची, वर्षाचे बाराही महिने इथे दिव्यांची आरास केली जायची. पंचगंगेच्या संगमावर वसलेल्या या ठिकाणी वर्षभर दिव्यांचा उत्सव साजरा केला जायचा.

पूर्वीच्या काळात या ठिकाणी अनेक मंदिरं स्थापित केली गेली होती आणि या मंदिरांमध्ये नेहमीच अनेक दिव्यांची रोषणाई असायची किंवा उत्सव साजरे केले जायचे, परिणामी सतत रोषणाईमुळे ही जागा उजळून निघायची आणि म्हणूनच या जागेला दीपवती बेट (Deepavati Island Goa) असं नाव पडलं, असं सांगितलं जातं.

पर्यावरणप्रेमी, गोव्याच्या मंदिरांचे आणि इतिहासाचे अभ्यासक, लेखक श्री. राजेंद्र केरकर सांगतात, पाच नद्या एकत्र येऊन बनलेल्या संगमावर दीपवती बेट होतं. पश्चिम घाटात उगम पावलेल्या नद्यांच्या पाण्याच्या गाळापासून हे बेट तयार झालं होतं आणि म्हणूनच इथली जमीन शेतीला पोषक होती. शेती हा त्या काळातला प्रमुख व्यवसाय असल्याने अनेक शेतकरी कुटुंबांनी इथे येऊन वास्तव्य केलं. इथल्या खार जमिनीवर भात शेती केली जायची.

Goa Diwali Festival: पूर्वीच्या काळात या ठिकाणी अनेक मंदिरं स्थापित केली गेली होती आणि या मंदिरांमध्ये नेहमीच अनेक दिव्यांची रोषणाई असायची  किंवा उत्सव साजरे केले जायचे, परिणामी ही जागा उजळून निघायची आणि म्हणूनच या जागेला दीपवती बेट असं नाव पडलं
Diwali 2024: जिथे 'आशा' प्रज्वलित होते! गोव्यातील महिला पुनर्वसनाची ज्योत..

दीपवती बेट हे त्याकाळचं धान्याचं कोठारच होतं, फळाफुलांनी संपन्न, शेतीभाताने परिपूर्ण. शेतीमधून लोकांना पैसा मिळायचा, घर चालायचं. आत्ताच्या घडीला ज्या स्वयंपूर्ण गोव्याच्या आपण शोधत आहोत किंवा स्वयंपूर्ण बनण्याचा प्रयत्न करतोय दीपवती बेट कैक वर्षांपूर्वीयाच स्वयंपूर्णतेचं स्वरूप होतं. या बेटावर आनंद नांदायचा आणि यासाठीच ईश्वराचे आभार मानावे म्हणून स्थानिकांनी इथे अनेक देवळांची निर्मिती केली होती.

राजेंद्र केरकर (Rajendra Kerkar Goa) यांच्याशी झालेल्या बोलण्यातून दीपवती बेटावर १५१० पूर्वीच्या काळात पन्नासच्या आसपास हिंदू मंदिरं असल्याचं समजलं.

दीपावती बेटाला हे नाव का पडलं याचं प्रमुख कारण इथे बारा महिने सुरु असलेले धार्मिक उत्सव आहेत. आज नार्वे इथे असलेलं सप्तकोटेश्वराचं मंदिर (Saptakoteshwar temple Narve) असो किंवा खांडोळ्याचा महागणपती (Mahaganpati Khandola). ही आणि अशी अनेक मंदिरं दीपवती बेटाची शोभा वाढवत असत.

हिवाळ्याच्या दिवसांत भाताची कापणी झाल्यानंतर शेतकरी खुश व्हायचा आणि धनरूपी लक्ष्मीला किंवा घरदाराला आनंद देण्याऱ्या शक्तीचे आभार प्रकट करण्यासाठी म्हणून इथे दिव्यांची आरास तयार करायचा. इथूनच या बेटावर दिव्यांची परंपरा सुरु झाली.

दगड कोरून बनवलेल्या किंवा मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी मंदिरांचा परिसर उजळून निघायचा. एका पोर्तुगीज अभ्यासक महिलेला या भागात कादंबकालीन मंदिरांचे अवशेष मिळेले होते असा दाखला राजेंद्र केरकरांनी दिला.

दीपावती बेटाच्या नावामागचा आणखीन एक इतिहास असंही सांगतो की केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या या लोकांना पतंगासारखे कृमी-कीटक प्रचंड त्रास देत असत. कृमी कीटकांच्या उपद्रवाला कंटाळून आणि शेतीची नासधूस टाळण्यासाठी स्थानिकांनी दिव्यांचा आधार घेतला. तेलाच्या दिव्यांमुळे कृमिकीट पळून जायचे, किमबहूना त्यांचा नाश व्हायचा.

समुद्रकिनारी मिळणारी उंडी सारखी वनस्पती असो किंवा करंजीचं झाड लोकं या पाना-फळांचा वापर करून तेल बनवायचे आणि या तेलांमधून दिवाळी उजळून निघायची. करंज्याच्या तेलामुळे कीटक पळून जात असत आणि शेतीचं रक्षण व्हायचं आणि म्हणून या भागात कायम दिवाळी असल्यागत वाटायचं.

पोर्तुगीजांचं आगमन: (Portuguese In Goa)

वर्ष १५१० मध्ये गोव्यात आलेल्या पोर्तूगिजांनी या भागाची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीजांच्या आगमनानंतर दीपवती बेटाचं चित्र बदललं ते कायमचं. गोव्यावर राज्य करायचं असेल तर स्थानिकांच्या श्रद्धास्थानांवर हल्ला करा हे पोर्तूगीजांना माहिती होतं.

मंदिराच्या रक्षणासाठी बेटावरील लोकांनी मुर्तीसह इतरांत भागांमध्ये पलायन करायला सुरुवात केली आणि म्हणूनच दीपवती बेटावरची हातकेश्वरासारखी मंदिरं आज गोव्याच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळतात.

Goa Diwali Festival: पूर्वीच्या काळात या ठिकाणी अनेक मंदिरं स्थापित केली गेली होती आणि या मंदिरांमध्ये नेहमीच अनेक दिव्यांची रोषणाई असायची  किंवा उत्सव साजरे केले जायचे, परिणामी ही जागा उजळून निघायची आणि म्हणूनच या जागेला दीपवती बेट असं नाव पडलं
Portuguese Empire : पोर्तुगीज साम्राज्याची नाकेबंदी

दीपावती बेट आजही त्याच ठिकाणी आहे, फरक मात्र एवढाच की आता तिथे वर्षाचे बाराही महिने दिव्यांची भलीमोठी आरास दिसत नाही. लॅटिन आणि हिंदू संस्कृती जपणारी लोकं आज तिथे निवास करतात आणि आपण त्याला दिवाडी किंवा दिवार आयलंड (Divar Island Goa) म्हणून ओळखतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com