पाचव्या शतकातील जहाजनिर्मिती प्रक्रियेचा वापर करुन गोव्यात सध्या एका जहाजाची बांधणी केली जात आहे. पणजीजवळील दिवाडी बेटावर या जहाजाच्या बांधणीचे काम सुरु आहे. बांधणी पूर्ण झाल्यानंतर हे जहाज गुजरातमधील मांडावी नदीतून मस्कतच्या दिशेने मार्गक्रमण करेल. डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रवास सुरु होणार असल्याची माहिती पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.
दिवाडीतील होडी इनोव्हेशन शिपयार्डमध्ये रत्नाकर दांडेकर आणि त्यांचा मुलगा प्रथमेश हे या जहाजाची बांधणी करतायेत. यापूर्वी त्यांनी म्हादई आणि तारिणी यासारखी प्रसिद्ध जहाजं तयार केली आहेत.
आपल्याजवळ आजही अशाप्रकारचे बांधल्या जाणाऱ्या जहाजांच्या नोंदी फारच कमी आहेत मात्र महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यांमध्ये एका भिंतीवर या प्रकारच्या जहाजाचे चौथ्या शतकातील चित्र आढळले आणि मिळालेल्या पुराव्यांवरून गोव्यात या नवीन जहाजाची बांधणी सप्टेंबर २०२३ पासून सुरु आहे. ही बांधणी पूर्ण झाल्यानंतर नौसेनेकडून जहाजातील चालक दलाची आखणी केली जाईल.
मूलघलांच्या काळात ज्या प्रकारे जहाजांची बांधणी केली जायची अगदी तशाच प्रकारे भारतात पून्हा एकदा जहाजाची बांधणी सुरु आहे. संजीव सन्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या अनेक वर्षांपासून आपण ही पद्धत केवळ मासेमारीच्या होड्यांपर्यंत मर्यादित ठेवली होती मात्र आता देशात पुन्हा एकदा जुन्या पद्धतीच्या जहाजबांधणीचं काम सुरु झालं आहे".
संजीव सन्याल यांच्या अंदाजानुसार या जहाजाची बांधणी २०२५ मधल्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल, आणि त्यांनतर डिसेंबर महिन्यात याच जहाजाचा पहिला प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे. या जहाजाने जर का यशस्वी प्रयाण करून दाखवले तर भारत पुन्हा एकदा याच जहाजप्रक्रियेचा वापर करत ओडिशातून इंडोनेशियातील बालीपर्यंत प्रयाण करण्याची शक्यात आहे. भारतीय गेल्या ५,००० वर्षांपासून हिंद महासागरात नौकानयन करतायत. भारताने आशिया खंडातील कैक देशांसोबत व्यवहार देखील केलेत मात्र तरीही याबद्दल फारसा उल्लेख केला जात नाही असे संजीव सन्याल म्हणालेत.
पारंपारिक जाहज बांधणीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेल्या या प्रकल्पाची देखरेख सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय नौदलाच्या मदतीने आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.
अशाप्रकारची जहाजं किंवा नौका हिंद महासागरातील कालबाह्य परंपरा म्हणावी लागते. जुन्या काळात कॉयर दोरीचा वापर करून लाकडी फळ्यां जोडून ही जहाजं जोडली जायची. गोव्या व्यतिरिक्त केरळ आणि लक्षद्वीपमध्ये या जहाजांचा वापर व्हायचा आणि आता अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा जुन्या पद्धतीचं हे जहाज समुद्रात उतरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.