Portuguese Empire : पोर्तुगीज साम्राज्याची नाकेबंदी

Portuguese Empire : डचांनी केलेल्या सागरी नाकेबंदीचा कालखंड हा गोव्यातील पोर्तुगिजांसाठी सर्वांत कठीण व इतका नामुष्कीचा होता की, त्यानंतर पोर्तुगीज साम्राज्य त्यातून कधी सावरलेच नाही.
Goa
GoaDainik Gomantak

सर्वेश बोरकर

एकेकाळी अरबी समुद्रावर राज्य करणाऱ्या बलाढ्य पोर्तुगीज साम्राज्यांची जहाजे गोव्याच्या किनाऱ्यावर सुमारे ६० वर्षांच्या कालावधीत गोव्यात नाकेबंदी होऊन बसणे ही ऐक साधारण घटना नव्हती.

वारसाहक्काच्या युद्धात पोर्तुगालचा स्पेनकडून पराभव झाल्यानंतर डच सर्व आंतरराष्ट्रीय व्यापारापासून तोडले गेले व मुख्यतः स्वतःचे परदेशात साम्राज्य स्थापन करण्यास प्रवृत्त झाले.

डच लोकांनी जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी व्हेरेनिग्डे ओस्टिंडिश कंपनी किंवा युनायटेड डच ईस्ट इंडिया कंपनीपासून सुरुवात केली, जी संपूर्ण इतिहासातील त्यावेळची सर्वात श्रीमंत कंपनी होती.

गोव्याची पहिली डच नाकेबंदी ही तशी एक साधारण घटन.पण पुढे ६० वर्षांच्या कालावधीत जे घडले, ज्यामध्ये दोन विनाशकारी नौदल साम्राज्यांचा संघर्षांचा समावेश होता, हे खरंच गोव्यासाठी दुर्दैवी कारण डच लोकांनी मोठ्या पोर्तुगीज व्यापारी जहाजाना गोवा सोडण्यापासून यशस्वीपणे रोखले.

डच नाकेबंदीच्या या संपूर्ण कालावधीत पोर्तुगीजांनी मसाल्यांच्या व्यापारातून मिळवलेली अफाट संपत्ती त्यांना व्यर्थ ठरली आणि त्यांची तांत्रिक प्रगती तसेच परदेशातील धोरणे व नव्या युगातील स्वायत्त कंपन्यांशी पोर्तुगीज जुळवून घेऊ शकले नाही, त्या डच नाकेबंदीमुळे गोव्याचा व पोर्तुगीजांचा अंत होणे अपरिहार्य होते.

सन १६०४ ते सन १६६३ या कालावधीत गोव्याची सरासरी संपत्ती, जमीन मालक तसेच सामान्य लोक दोघांचीही झपाट्याने घट झाली. या आर्थिक मंदीने आणखी सामाजिक तणाव व राजकीय गैरव्यवस्थापनाला जन्म दिला गेला आणि गोव्याच्या समाजात अविश्वासाची व तिरस्काराची सामान्य भावना निर्माण झाली.

गोव्याच्या शहरातील इमारतीं व घरे पैशाच्या कमतरतेमुळे जीर्ण होत गेल्या आणि उदरनिर्वाहाची साधने बंद झाल्याने गरिबी आणि सामान्य रहिवाशांच्या दुःखात भर पडली.

जेव्हा सन १६०४ मध्ये गोव्याची म्हणजे मांडवी नदीच्या मुखाची संपूर्ण महिनाभर नाकेबंदी सुरू करुन डच लोकांनी पोर्तुगीजांना आश्चर्यचकित केले आणि परत एकदा सन १६०६ मध्ये दोन महिने पोर्तुगीजांचा पुर्ण व्यापारच बंद पडला.

त्या वेळी पोर्तुगीजांकडे मांडवीच्या मुखाचे संरक्षण करण्यासाठी फक्त दोनच किल्ले होते - रेईस मागुस आणि गास्पार डाएस, परंतु पोर्तुगीजांना त्वरित लक्षात आले की मांडवी नदीच्या मुखाशी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण नसल्याने नाकेबंदी आणखीनच घातक होऊ शकते, यामुळे १६१२ मध्ये अपूर्ण झालेल्या आग्वाद किल्ल्याचे बांधकाम पुन्हा सुरू झाले.

आग्वाद किल्ला पोर्तुगीज लष्करी वास्तुकलेचा उत्तम नमुन्यापैकी एक.यात भक्कम भिंती, बुरुज आणि खंदक बनवले गेले. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या परिसरात गोड्या पाण्याचा मोठा साठा बनवला गेला , ज्याला आग्वादा टाकी म्हणून ओळखले जाते, ज्याचा वापर जहाजांमध्ये पाणी साठवण्यासाठी केला जात असे.

सन १६०६ मध्ये डचांनाही या चकमकीतून एक मौल्यवान धडा शिकायला मिळाला, तो म्हणजे त्यांच्या नाकेबंदीसाठी कायमस्वरूपी दारूगोळा पुरवठा करणाऱ्या साखळी शिवाय आशियातील पोर्तुगीज वर्चस्वाला आव्हान देण्याची त्यांना कोणतीही संधी नव्हती. आणि म्हणून, त्यांनी वेंगुर्ला येथे पहिला कारखाना सुरू करण्याचे अधिकार विजापूर सल्तनतीकडून मिळवले.

Goa
Goa Politics: न झालेल्या कार्यक्रमांसाठी दिले 26 लाखांचे अनुदान! सभापतींचा मंत्री गावडेंवर आरोप

सन १६३८ मध्ये दारूगोळा पुरवठा साखळी सुरू करुन , डच लोक परत आले आणि त्यांनी गोव्यात मांडवी नदीच्या वाळूच्या पट्टीवर नांगरून वर्षभर गोव्याची यशस्वी नाकेबंदी केली. यामुळे दोन बलाढ्य साम्राज्याच्या शक्तींमधील पहिले मोठे युद्ध होऊन पोर्तुगीजांनी शेवटी विजय मिळवला आणि डच जहाजे नष्ट करण्यासाठी स्वतःची जहाजे जाळून टाकण्याचे कठोर धोरण स्वीकारले.

तथापि, डच अजूनही धोरणात्मक विजय मिळवणार होतेच , कारण पुढच्या वर्षी, वास्को मुरगाव बंदरावर अचानक हल्ला करून , तिथे त्यांनी बॉम जीझस, साओ सेबॅस्टिओ आणि साओ बोव्हेंटुरा या तीन गॅलियन म्हणजे गलबते नष्ट केली. १६५७ मध्ये शेवटच्या वेळी डच परत येईपर्यंत खुल्या समुद्रात चकमकी आणि चाचेगिरी चालू राहिली.

डच आणि पोर्तुगीज यांच्यात, सन १६५८ मध्ये आधीच भयंकर चालू असलेल्या नाकेबंदी दरम्यान गोव्याची दुसरी लढाई सुरू झाली. दोन्ही बाजूंनी हजारो जीव गमावले गेले, प्रचंड जहाजे खोल समुद्रात कोसळली.

ही एक निर्णायक लढाई होती. ही घटना गोव्यासाठी महत्त्वाची होती याचे कारण म्हणजे याने पूर्वेकडील पोर्तुगीजांना अंतिम धक्का दिला, हे सूचित केले की ते यापुढे समुद्राचा अस्पृश्य भाग राहिलेला नाही. हे आवरण आता डचांकडे गेले होते.

हेगच्या तहावर स्वाक्षरी झाल्यानंतर १६६१ पर्यंत डच नाकेबंदी संपुष्टात आली होती. काही वर्षांनंतर दोन शक्तींमध्ये शांतता करारही झालेला, परंतु खेदाची गोष्ट म्हणजे, तोपर्यंत नुकसान आधीच झाले होते.

डच नाकेबंदीमुळे गोव्याला त्याच्या इतिहासाच्या सर्वात गडद भागांमध्ये बुडवले गेले होते, ज्यातून पोर्तुगीज साम्राज्य कधीही सावरले नाही.

डचांनी केलेल्या सागरी नाकेबंदीचा कालखंड हा गोव्यातील पोर्तुगिजांसाठी सर्वांत कठीण व इतका नामुष्कीचा होता की, त्यानंतर पोर्तुगीज साम्राज्य त्यातून कधी सावरलेच नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com