Three Kings Feast: शेकडो वर्ष जुना गोव्यातील आगळावेगळा 'तीन राजांचा फेस्टिवल'

Three Kings Feast Goa: 'थ्री किंग्स फिस्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेला एपिफनीचा सण कुयेली येथील अवर लेडी ऑफ रेमेडियस कपेलमध्ये साजरा झाला.
Three Kings Feast
Three Kings Feast CuelimDainik Gomantak
Published on
Updated on

Celebration of Three Kings Feast in Goa

थ्री किंग्स फिस्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेला एपिफनीचा सण कुयेली येथील अवर लेडी ऑफ रेमेडियस कपेलमध्ये काल सोमवार दि. ६ जानेवारी रोजी साजरा झाला. शेकडो वर्षांच्या जुन्या परंपरेनुसार तीन राजांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तीन मुलांचे घोड्यावर बसून तिथे आगमन झाले.

कुयेली येथील एरन फर्नांडिस, कासावली येथील एथन ग्रासियस आणि आरोशी येथील केडेन कोरिया यांना यावर्षी तीन राजांचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला. हे तिन्ही युवा राजे संगीताच्या तालावरील मिरवणुकीमध्ये घोड्यावर बसून तीन वेगवेगळ्या मार्गांनी कपेलजवळ एकत्र आले. कासावलीच्या डोंगरमाथ्यावरील रेमेद सायबिणीच्या केवळ अर्ध्या दिवसाच्या या फेस्ताला भाविकांची मोठी गर्दी होती.

Three Kings Feast
Saint Francis Xavier Feast: स्थानिकांवर 'गोंयच्या सायबाची' कृपा कायम; सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त संपन्न

कासावलीच्या मुर्डी गावातील डांेगरमाथ्यावर निर्जनस्थळी अवर लेडी ऑफ रेमेडियसचे कपेल आहे. हे कपेल रेमेद सायबिणीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हे फेस्त साजरे होते. या फेस्ताचे मुख्य आकर्षण म्हणजे 'थ्री किंग्स मास्टर्स'! हे मास्टर्स म्हणजे तीन किशोरवयीन मुले असतात. राजकुमाराच्या वेशात घोड्यावर स्वार होऊन त्यांना ठिक दहाच्या प्रार्थनेला उपस्थित राहावे लागते.

मास्टर्सचा हा मान येथील कासावली, कुयेली व आरोशी गावातील गावकार कुळातील मुलांनाच मिळतो. त्यांना 'रे' असेही म्हटले जाते. हे थ्री मास्टर्स तीन गावांतून बॅण्ड पथकासह कपेलकडे जाणाऱ्या पारंपारिक वाटेवरूनच प्रार्थना सभेला येतात. या आगळ्या परंपरेमुळे या फेस्ताला ‘थ्री किंग्स फेस्त’ म्हणून ओळखले जाते. काहींच्या मते हे राजकुमार देवाचे दूत व सुख शांतीचे प्रतिक असतात.

Three Kings Feast
गोव्यात 'Three Kings Feast'साठी विशेष तयारी सुरु; कासावली, चांदोर, रेइस मागोस होताहेत सज्ज; तारीख जाणून घ्या

ख्रिश्चन बांधवाप्रमाणे गावातील हिंदू भाविकांचीही रेमेद सायबिणीवर श्रद्धा आहे. त्यामुळे आसपासच्या भागातील हिंदू भाविकही या फेस्ताला उपस्थित असतात. आजच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ बनविले जातात. पहाटे ५ ते दुपारपर्यंत अशा विशिष्ट वेळेतच हे फेस्त साजरे केले जाते. त्यानंतर हा भाग ओस पडतो.

(त्यानंतर तिथे कुणी राहू नये अशी प्रथा आहे.) गोव्यातील स्वादिष्ट पदार्थ, पारंपारिक मिठाई, खेळणी, कपडे आणि इतर वस्तूंचे तात्पुरते स्टॉल उत्सवाच्या वातावरणात भर घालत होते. एरवी वर्षभर बंद असणारे हे चॅपल नोव्हेनानिमित्त, नऊ दिवस होणाऱ्या प्रार्थनेच्या वेळेत व दहाव्या दिवशी फेस्ताच्या निमित्ताने अर्धा दिवस खुले असते. मागील अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा येथील गावकऱ्यांनी आजतागायत चालू ठेवलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com