Saint Francis Xavier Feast: स्थानिकांवर 'गोंयच्या सायबाची' कृपा कायम; सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त संपन्न

Saint Francis Xavier Feast 2024: सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त जुने गोवा येथे उत्साहात साजरे करण्यात आले. सकाळी १०.३० झालेल्या विशेष प्रार्थनेला लुईस अँतोनियो टॅगले, प्रीफेक्ट ऑफ द डिकास्ट्री फॉर इव्हँजेलायझेशन यांनी संबोधित केले.
st xavier feast
st xavier feastX
Published on
Updated on

Saint Francis Xavier Feast 2024

तिसवाडी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त जुने गोवा येथे उत्साहात साजरे करण्यात आले. सकाळी १०.३० झालेल्या विशेष प्रार्थनेला लुईस अँतोनियो टॅगले, प्रीफेक्ट ऑफ द डिकास्ट्री फॉर इव्हँजेलायझेशन यांनी संबोधित केले. यावेळी कार्डीनल फिलिप नेरी फेर्रांव व इतर धर्मगुरू उपस्थित होते. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यंदाचे फेस्त हे विशेष आहे, कारण सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिवाचा प्रदर्शन सोहळा देखील होत असल्याने मोठ्या संख्येत भाविक जुने गोव्यात दाखल झाले आहेत. प्रार्थनासभेत बोलताना कार्डीनल फेर्रांव यांनी आम्ही चांगल्या वार्ताचे संदेशवाहक असल्याचा पुनरुच्चार केला. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार, आमदार आणि भाविकांचे त्यांनी यावेळी स्वागत केले. फेस्त असल्याने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.

सीसीटीव्ही कॅमेरा, ड्रोन, टॉवर सारखे यंत्रणेद्वारे पोलिस सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे. यंदा शव प्रदर्शन असल्याने देश आणि विदेशातून भाविक जुने गोव्यात येत आहे. त्यात फेस्त हा महत्त्वाचा दिवस असल्याने आणखी या दिवशी लोकांची अलोट गर्दी झाली.

st xavier feast
Sunburn Festival 2024: CM सावंत ठरवणार ‘सनबर्न’चे भवितव्‍य, सत्ताधारी बाकांवरील आमदारांनीच दर्शवला होता विरोध

येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला !

धर्मगुरू टॅगले यांनी आम्ही ‘शुभ वार्ता’चे संदेशवाहक येशू ख्रिस्त हे परमेश्‍वराचे संदेशवाहक होते. आजच्या या युगात अनेक व्यक्ती संदेशवाहक म्हणून प्रचार करतात, परंतु त्यातील बरेच जण पाखंडी असतात. त्यासाठी आम्ही देवाचे पुत्र येशू ख्रिस्त यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालले पाहिजे, कारण त्यांनी या जगात शुभ वार्ता आणून त्याचा प्रचार केला होता, असे संबोधन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com