
The Three Kings Festival Goa 2025
पणजी: गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) आणि गोवा पर्यटन खाते यांनी गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या थ्री किंग्स फेस्ट साजरे करण्यासाठी विशेष तयारी सुरु केली आहे. ६ जानेवारी २०२५ रोजी कासावली, चांदोर, आणि रेइस दे मागोस या नयनरम्य गावांमध्ये आयोजित होणारा हा उत्सव, गोव्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवणार ठरणार आहे असे जीटीडीसीचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी सांगितले.
गावकर म्हणाले, थ्री किंग्स फेस्ट गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. हा उत्सव साजरा करताना गोव्याचा वैशिष्ट्यपूर्ण वारसा स्थानिक आणि जागतिक स्तरावर अधोरेखित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यावर्षीचा फेस्ट ५ जानेवारी २०२५ रोजी संपणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर प्रदर्शनानंतर लगेचच आयोजित केला जाणार आहे.
पर्यटकांना दोन मोठ्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचा अनुभव घेता येईल. स्थानिक हॉटेल्स आणि ट्रॅव्हल एजन्सीजसोबतच्या भागीदारीद्वारे, पर्यटकांसाठी विशेष पॅकेजेस तयार करण्यात येत आहेत. गोव्याच्या सांस्कृतिक समृद्धीचा अखंड अनुभव देण्यासाठी पॅकेजेस तयार केली जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.