China: राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी जिनपिंग यांच्याविरोधात मोहीम सुरु

चीनमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत.
Xi Jinping
Xi JinpingDainik Gomantak
Published on
Updated on

चीनमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असे भाकित वर्तवले जात आहे. दुसरीकडे मात्र, जिनपिंग यांच्याविरोधात टीकाकारांनी मोहीम सुरु केली आहे. (xi jinping critics launch campaign against chinese president ahead of election)

दरम्यान, जिनपिंग (Xi Jinping) यांनी चीनला अधोगतीकडे नेले आहे, असे टीकाकारांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव करुन चीनने (China) कधीही भरुन न येणारे नुकसान केले आहे. शांघायसारखी शहरे स्वेच्छेने बंद करुन जिनपिंग यांनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचे लोकांनी म्हटले आहे.

Xi Jinping
China: ड्रॅगन म्हणतोय, पाकिस्तान तुझ्यावर भरोसा नाय ना!

चीनची मोठी लोकसंख्या शी जिनपिंग यांच्यावर नाराज?

एएनआयच्या अहवालात असेही म्हटले आहे की, चीनची मोठी लोकसंख्या शी जिनपिंग यांच्यावर नाराज आहे. लोकांना बदल हवा आहे. टीकाकारांनी जिनपिंग यांच्याविरोधात मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत जिनपिंग यांच्या मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे व्हिडिओ शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चीनमध्ये राहणाऱ्या लोकांना असे करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचे आवाहन

चिनी जनतेला सध्याच्या परिस्थितीची माहिती आपल्या मित्रांना, नातेवाइकांना द्यावी आणि जिनपिंग यांना सत्तेवरुन हटवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच लष्करी जवानांचे मित्र बनू नका, असेही आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत अधिकाधिक लोकांना सहभागी व्हावे.

Xi Jinping
China: शी जिनपिंग 'सेरेब्रल एन्युरिझम' नावाच्या आजाराने ग्रस्त

शी जिनपिंग यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत

टीकाकारांनी नागरिकांना (Citizens) भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगचे (Money laundering) पुरावे सादर करण्याचे आवाहन केले आहे. ही मोहीम अशा वेळी सुरु झाली आहे, जेव्हा शी जिनपिंग यांची चीनमधील पकड कमकुवत झाली आहे. कोरोना व्हायरस, अर्थव्यवस्था आणि गुंतवणुकीबाबत शी जिनपिंग यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com